ETV Bharat / city

मुंबईतून सुटणाऱ्या चार रेल्वे गाड्यांचे रुपडे पालटणार; प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा - मध्य रेल्वे नवीन कोच

जुन्या प्रकारातील चेन्नई येथे बनविण्यात येणारे इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) प्रकारातील डब्यांऐवजी लिके होल्फमन बुश (एलएचबी) डबे आता रेल्वे प्रवासी गाड्यांना जोडण्यात येत आहेत. पंजाब येथील कपूरथळातील रेल कोच फॅक्टरीत आधुनिक प्रकारातील डबे बनविण्यात येत आहेत. या डब्यांची लांबी आणि रूंदी जास्त असल्याने प्रवाशांना प्रवास आरामदायी होणार आहे.

मध्य रेल्वे नवीन कोच
मध्य रेल्वे नवीन कोच
author img

By

Published : Sep 29, 2021, 3:58 PM IST

मुंबई - डब्यांची वाढवण्यात आलेली लांबी आणि रूंदी, मोठे प्रवेशद्वार, सुधारित रचनेचे बेसीन आणि शौचालय अशा बदललेल्या रुपातली गाड्या आणि त्यातही वाढलेला वेग यामुळे मध्य रेल्वेने एलटीटी-करमळी, एलटीटी-लखनऊ, एलटीटी-प्रयागराज, एलटीटी-हरिद्वार या एक्स्प्रेसचा प्रवास आणखी सुखकर आणि अधिक आरामदायी होणार आहे. आता नव्या प्रकारातील एलएचबी (लिके होल्फमन बुश) डबे या चार गाड्यांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

'असे' असणार एलएचबी डबे

जुन्या प्रकारातील चेन्नई येथे बनविण्यात येणारे इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) प्रकारातील डब्यांऐवजी लिके होल्फमन बुश (एलएचबी) डबे आता रेल्वे प्रवासी गाड्यांना जोडण्यात येत आहेत. पंजाब येथील कपूरथळातील रेल कोच फॅक्टरीत आधुनिक प्रकारातील डबे बनविण्यात येत आहेत. या डब्यांची लांबी आणि रूंदी जास्त असल्याने प्रवाशांना प्रवास आरामदायी होणार आहे. प्रवाशांना गाडीतून फिरण्यास जास्त जागा मिळणार आहे. डब्यामधील बेसिन, टॉयलेट यांच्या रचनेत सुधारणा केली आहे. मध्य रेल्वेने गाडी क्रमांक 02171/02172 एलटीटी-हरिद्वार विशेष, गाडी क्रमांक 02293/02294 एलटीटी-प्रयागराज विशेष 4 ऑक्टोबरपासून एलटीटी येथून एलएचबी डबे जोडून धावेल. गाडी क्रमांक 01015/01016 एलटीटी-करमळी विशेष एलटीटी येथून 7 ऑक्टोबरपासून एलटीटी आणि करमळी येथून एलएचबी कोच जोडून धावेल. गाडी क्रमांक 02121/02122 एलटीटी-लखनऊ विशेष 18 डिसेंबरपासून एलटीटी येथून एलएचबी डबे जोडून धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुखकर प्रवास

एलएचबी कोचमध्ये प्रवासी क्षमता वाढणार आहे. यासह शयनयान (स्लीपर कोच) ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकतात. एसी ३ टायर (बी १ ते बी ५)मध्ये ६४ ऐवजी ७२ प्रवासी, एसी २ टायरमध्ये ५४ आणि एचए १मध्ये २४ प्रवासी क्षमता आहे. या रेल्वेगाड्या एक प्रथम वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, 15 तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि 2 जनरेटर व्हॅनच्या सुधारित संरचनांसह धावतील. याशिवाय स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थची रूंदी वाढण्याने ज्येष्ठ नागरिकांना झोपण्यास जादा जागा मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.