मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयातील कंत्राटी प्राध्यापक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या मागणीसाठी उद्या, 29 एप्रिलपासून कंत्राटी डॉक्टर काम बंद करणार होते. मात्र आज वैद्यकीय सचिव, शिक्षण आणि इतर अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. यावेळी कंत्राटी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या 8 दिवसात तयार करत मंत्री मंडळासमोर ठेवले जातील असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटना, महाराष्ट्र यांनी काम बंद आंदोलन 15 दिवसांसाठी स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान उद्यापासून हे डॉक्टर काळ्या फिती लावत काम करणार आहेत. तर 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.
जानेवारीत ही केले होते आंदोलन
राज्यभरात 450हून अधिक कंत्राटी डॉक्टर असून कमी वेतनावर ते सेवा देत आहेत. अगदी कोविड काळात ही ते अविरत सेवा देत आहेत. दरम्यान आपल्याला कायम स्वरूपी सेवेत सामावून घ्यावे आणि वेतन निश्चित करावी ही मागणी करत वर्षभरापासून हे डॉक्टर सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. पण सरकार मात्र त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी कित्येक वेळा त्यांनी आंदोलन केले आहे. चार महिन्यापूर्वी, जानेवारी महिन्यात सर्वात मोठे आंदोलन केले होते. मात्र त्यानंतर ही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
15 दिवसांचे अल्टीमेटम
15 एप्रिलला कंत्राटी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी 28 एप्रिलच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मागण्याचे प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 28 एप्रिलला मंत्रीमंडळात याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर 29ला बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला होता. पण आज याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे हे डॉक्टर नाराज झाले. त्यानंतर मात्र उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी व्हीसी घेत त्यांना 8 दिवसात मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी 15 दिवसासाठी आंदोलन पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.
कंत्राटी प्राध्यापक डॉक्टरांचे काम बंद आंदोलन 15 दिवसांकरता पुढे; उद्यापासून काळ्या फिती लावून काम - वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटना
राज्यभरात 450हून अधिक कंत्राटी डॉक्टर असून कमी वेतनावर ते सेवा देत आहेत. अगदी कोविड काळात ही ते अविरत सेवा देत आहेत. दरम्यान आपल्याला कायम स्वरूपी सेवेत सामावून घ्यावे आणि वेतन निश्चित करावी ही मागणी करत वर्षभरापासून हे डॉक्टर सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.
मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयातील कंत्राटी प्राध्यापक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या मागणीसाठी उद्या, 29 एप्रिलपासून कंत्राटी डॉक्टर काम बंद करणार होते. मात्र आज वैद्यकीय सचिव, शिक्षण आणि इतर अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. यावेळी कंत्राटी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या 8 दिवसात तयार करत मंत्री मंडळासमोर ठेवले जातील असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटना, महाराष्ट्र यांनी काम बंद आंदोलन 15 दिवसांसाठी स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान उद्यापासून हे डॉक्टर काळ्या फिती लावत काम करणार आहेत. तर 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.
जानेवारीत ही केले होते आंदोलन
राज्यभरात 450हून अधिक कंत्राटी डॉक्टर असून कमी वेतनावर ते सेवा देत आहेत. अगदी कोविड काळात ही ते अविरत सेवा देत आहेत. दरम्यान आपल्याला कायम स्वरूपी सेवेत सामावून घ्यावे आणि वेतन निश्चित करावी ही मागणी करत वर्षभरापासून हे डॉक्टर सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. पण सरकार मात्र त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी कित्येक वेळा त्यांनी आंदोलन केले आहे. चार महिन्यापूर्वी, जानेवारी महिन्यात सर्वात मोठे आंदोलन केले होते. मात्र त्यानंतर ही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
15 दिवसांचे अल्टीमेटम
15 एप्रिलला कंत्राटी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी 28 एप्रिलच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मागण्याचे प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 28 एप्रिलला मंत्रीमंडळात याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर 29ला बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला होता. पण आज याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे हे डॉक्टर नाराज झाले. त्यानंतर मात्र उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी व्हीसी घेत त्यांना 8 दिवसात मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी 15 दिवसासाठी आंदोलन पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.
TAGGED:
mumbai news