मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नियमावली यापुढे अधिक कठोर होणार आहेत. यासंदर्भातील नवे परिपत्रक सरकारने आज जाहीर केले आहे.
राज्यात टाळेबंदी लागू करणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात असताना सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या मार्गदर्शक लागू केल्या आहेत.
हेही वाचा-निश्चित दरापेक्षा अधिक किंमतीने मास्क विकल्यास होणार कारवाई
असे आहेत अध्यादेश-
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांहून अधिक आढळत असल्याने ठाकरे सरकारने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्यातील सर्व रेस्टॉरंट, सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. मात्र, यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
हे नियम शॉपिंग मॉल्सनाही अनिवार्य राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवरदेखील बंदी घालण्यात आल्याचे यात नमूद आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात 20 पेक्षा जास्त जणांना परवानगी दिली जाणार नाही, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा-मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या
राज्यातील कोरोनाची स्थिती -
राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात आज नव्या 15 हजार 051 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यूदर 2.27 टक्के इतका आहे, असे असले तरी रुग्ण संख्येचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नाही.
- राज्यात 10 हजार 671 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
- राज्यात आतापर्यंत 21 लाख 44 हजार 743 रुग्णांनी केली कोरोनावर मात केली आहे.
- राज्यात नव्या 15, 051 रुग्णांची नोंद झाली.
- राज्यात 48 रुग्णांचा मृत्यु झाला झाला असून मृत्यूदर 2.27 टक्के आहे.
- राज्यात एकूण 23 लाख 29 हजार 464रु रुग्णांची नोंद आहे.
- राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 1 लाख 30 हजार 547 आहेत.