मुंबई : व्हॅलेंटाईन डे नंतर सुरू झालेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात चांगलीच तेजी बघायला मिळाली. सोमवारी सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरूवात होताच शेअर बाजार 463 अंकांनी उसळून 52 हजारांच्या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर पोहोचला. निफ्टीतही 126 अंकांची वाढ झाली. निफ्टीही 15,289 अंकांच्या पातळीवर पोहोचला.
52 हजारांचा ऐतिहासिक उच्चांक
सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच बाजारात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. बीएसई आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठी उसळी सकाळच्या सत्रात बघायला मिळाली. बीएसईच्या निर्देशांकात 463 अंकांची वाढ होऊन निर्देशांक प्रथमच 52,008 अंकांवर पोहोचला. नंतरही निर्देशांकात वाढ होत राहिली. सकाळच्या सत्रात निर्देशांक 524 अंकांनी वधारून 52,068 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीत 138 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 15,302 अंकांवर पोहोचला होता.
हेही वाचा - शेअर बाजार निर्देशांकाचा नवा विक्रम; रिलायन्सचे शेअर तेजीत