मुंबई - २८ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi government ) दोन वर्षे पूर्ण झाली. पण त्या अगोदर २३ नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) व राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी घेतलेल्या शपथविधीला सुद्धा दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु आजही त्या शपथविधीचा पश्चाताप होतो, असे मत देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
'शिवसेनेने दगाफटका केल्याने शपथविधी'
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ घेण्याच्या निर्णयावरुन पश्चात्ताप व्यक्त केला आहे. फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, शिवसेनाने दगाफटका दिल्यानंतर आम्ही अजित पवार बरोबर एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला होता. परंतु त्यानंतर जे काही झाले त्या कारणाने आम्हाला आजही त्या शपथविधीचा पश्चाताप होत आहे, असे फडवणीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी देशभर गाजला होता. या शपथविधीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली होती. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी या तिन्ही पक्षांचे नेतृत्व करत आपल्याहाती सूत्र घेतल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसण्यास मजबूर केले होत.
'या सर्वांवर एक पुस्तक लिहणार'
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की हा शपथविधि झाला नसता तर चांगल झाले असते. असेही सारखे वाटते. त्यावेळी काय झाले होते आणि कोणी काय केले होते याची पूर्ण माहिती आपणाला असून यावर आपण एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात फक्त सरकार असून प्रशासन नसल्याची टीकाही त्यांनी केली.
'ठाकरे सरकारने कोरोना आकडेवारी लपवली'
ठाकरे सरकारने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रात कोरोना स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात आली नसल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने १० हजार मृत्यू लपवले. सरकारने कोरोना स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचे सांगत आपली पाठ थोटपली. मात्र देशातील एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाल्याचो सत्य ते स्वीकार का करत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - Param Bir Waze Meeting : सिंग-वाझे भेटीबाबत चौकशीचे आदेश - गृहमंत्री वळसे