ETV Bharat / city

Annabhau Sathe Memorial : राज्य सरकारला अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकावरून उच्च न्यायालयाने फटकारले; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे स्मारक रशियामध्ये ( Lokshahir Annabhau Sathe memorial in Russia ) उभारण्यात आले आहे. मात्र मुंबईतील स्मारकासाठी मोठे पाऊल उचलले का ? राज्य सरकारने कोणते पाऊल उचलले याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. जाणून घ्या काय आहे याचिका

Mumbai high court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Sep 15, 2022, 2:06 PM IST

मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे स्मारक रशियामध्ये ( Lokshahir Annabhau Sathe memorial in Russia ) उभारण्यात आले आहे. मात्र मुंबईतील स्मारकासाठी ( Lokshahir Annabhau Sathe memorial in mumbai )मोठे पाऊल उचलले का ? राज्य सरकारने कोणते पाऊल उचलले याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai high court ) दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

काही प्रलंबित मागण्या कागदावरच : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ( Lokshahir Annabhau Sathe ) यांच्या स्मारकासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. 2003 पासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील स्मारकासह अन्य काही प्रलंबित मागण्या कागदावरच राहिल्या आहेत. साहित्यिक, कलावंत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक ग्रंथालय संस्थेच्यावतीने 31 ऑगस्ट 2003 रोजी तात्कालीन मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत 13 मागण्या केल्या होत्या.

कोणत्या मागण्या झाल्या मान्य : त्यापैकी अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील घाटकोपर येथील घराचे सुशोभिकरण करणे आणि मुंबईत भव्य स्मारक उभारणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामफलक असलेले एल.वी.एस मार्ग येथे प्रवेशद्वार बनविणे जिजामाता उद्यान येथे खुले नाट्यगृह शासनाने सुरू करून संस्थेला कायमस्वरुपी चालविण्यास देणे तसेच मुंबईतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावे ग्रंथालय उभारणे इ. पाच मागण्या मान्य करण्यात आल्या. जिजामाता उद्यानातील खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याची तरतुद करण्यात आली आणि त्यासाठी लागणारा निम्मा निधी मनपा आणि उवर्रित निधी सामाजिक न्याय विभागाकडून मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

उच्च न्यायालयात जनहित याचिका : अद्यापही कोणत्याही मागण्यांची पूर्तता झालेली नाही म्हणून संस्थेचे अध्यक्ष शहाजीराव थोरात यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. 2017 साली तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या उपस्थित अण्णाभाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी स्मारक समिती स्थापन करण्यात आली. मात्र या समितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या लढ्यात सहभागी असलेल्या कोणाचाही सहभाग नसल्याने याचिकाकर्त्यांनी समितीलाही याचिकेत विरोध केला आहे. सदर याचिकेवर नुकतीच मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

काय आहे याचिका ? वर्ष 2003 पासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील स्मारकासह अन्य काही प्रलंबित मागण्या आजही कागदावरच राहिलेल्या आहेत. साहित्यिक, कलावंत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक ग्रंथालय संस्थेच्या 31 ऑगस्ट 2003 रोजी तात्कालीन मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत 13 मागण्या केल्या गेल्या होत्या. त्यापैकी अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईतील घाटकोपर येथील घराचं सुशोभिकरण करणं आणि मुंबईत एक भव्य स्मारक उभारणं, अण्णाभाऊ साठे नामफलक असलेलं प्रवेशद्वार एल.बी.एस मार्ग येथे उभारणं, जिजामाता उद्यानात एक खुले नाट्यगृह शासनानं सुरू करून ते संस्थेला कायमस्वरुपी चालविण्यास देणं, तसेच मुंबईतच अण्णाभाऊ साठेच्या नावानं ग्रंथालय उभारणे अश्या पाच मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर जिजामाता उद्यानातील खुलं नाट्यगृह बंदिस्त करण्याची तरतुद करण्यात आली आणि त्यासाठी लागणारा निम्मा निधी मनपा आणि उवर्रित निधी सामाजिक न्याय विभागाकडून मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, अद्यापही यापैकी कोणत्याही मागणीची पूर्तता झालेली नाही. म्हणून संस्थेचे अध्यक्ष शहाजीराव थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका केली आहे. साल 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या उपस्थित अण्णाभाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी स्मारक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या समितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या लढ्यात सहभागी असलेल्या कोणाचाही सहभाग नसल्यानं याचिकाकर्त्यांनी या समितीलाही याचिकेतून विरोध केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.