ETV Bharat / city

Maharashtra Colleges Closed : मोठा निर्णय.. राज्यभरातील कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद - परीक्षासाठी हेल्पलाईन

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ( Covid Spread In Maharashtra ) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थ सहाय्यक विद्यापीठे, तंत्रनिकेतन विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार ( Maharashtra College Closed ) आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ( Higher Technical Education Minister Uday Samant ) यांनी ही घोषणा केली.

उदय सामंत
उदय सामंत
author img

By

Published : Jan 5, 2022, 6:59 PM IST

Updated : Jan 5, 2022, 7:05 PM IST

मुंबई - आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ( Covid Spread In Maharashtra ) आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला ( Schools Closed Maharashtra ) आहे. आता अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, स्वयं अर्थ सहाय्यक विद्यापीठ, तंत्रनिकेतन विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांचे वर्ग येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात ( Maharashtra College Closed ) आल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Higher Technical Education Minister Uday Samant ) यांनी केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सामंत यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मोठा निर्णय.. राज्यभरातील कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाचा प्रसार वेगाने

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण देखील झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह पुण्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त, कुलगुरू, शिक्षण अधिकारी यांची मंगळवारी बैठक पार पडली. बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घ्यावी. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचे पालन करावे, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या. नांदेड, जळगाव सारख्या भागात वीजेची अडचण सातत्याने जाणवते. तेथील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन पध्दतीने कशा घेता येतील, याबाबत कुलगुरुंनी चर्चा करुन निर्णय घ्यावा.

परीक्षासाठी हेल्पलाईन

परिक्षा काळात काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी विद्यापिठांनी हेल्पलाईन सुरु ( Helpline For Exams ) करावी. परिक्षेसाठी अभ्यासक्रम संकेतस्थळावर अपलोड करावा. अभ्यासक्रमांत स्पष्टता राहील, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. विद्यार्थ्यांंना येणाऱ्या प्रत्येक तक्रारींचे महाविद्यालयांनी निरसन करावे, असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले आहेत.

वसतीगृह बंद

वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील वसतीगृह पूर्णतः बंद ठेवण्यात ( College Hostels Closed Maharashtra ) येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक वसतिगृहात या नियमांची अंमलबजावणी करावी. परदेशातील विद्यार्थ्यांसाठी असलेली वसतिगृह मात्र बंद केली जाणार नाहीत. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशा सूचना मंत्री सामंत यांनी केल्या.

लसीकरण

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे का, याची चाचपणी करावी. विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध करावा. ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांची नोंदणी करुन घ्यावी. पॉलिटेक्निक महाविद्यालय मध्ये लसीकरणासाठी कॅम्प उभारावेत. प्राचार्य, प्र कुलगुरुंनी याबाबत कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश मंत्री सामंत यांनी दिली.

चित्रकला परिक्षाही ऑनलाईन

कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा येणार आहेत. चित्रकला परिक्षा 15 तारखेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने घ्याव्यात. प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले जावेत, अशी सूचना सामंत यांनी केली.

उपस्थिती 50 टक्क्यांवर

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची महाविद्यापिठातील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत केली आहे. प्रादुर्भाव टाळता यावा, यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सामंत म्हणाले. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत हा नियम लागू असेल. त्यानंतर महाविद्यालये नियमित प्रमाणे सुरु केली जातील. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच जारी केले जाईल. प्रत्येक महाविद्यालयांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.

Last Updated : Jan 5, 2022, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.