ETV Bharat / city

राज्याचा जीडीपी यंदा 5.7 टक्के राहणार; आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

author img

By

Published : Mar 5, 2021, 6:45 PM IST

8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्याआधी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या उत्पन्नात 1 लाख 56 हजारांची तूट झाली आहे. कोरोना संसर्गाचा राज्याला मोठा फटका बसला आहे.

vidhansabha
विधीमंडळ

मुंबई - 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्याआधी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या उत्पन्नात 1 लाख 56 हजारांची तूट झाली आहे. कोरोना संसर्गाचा राज्याला मोठा फटका बसला आहे. आर्थिक पाहणी अहवालामध्ये 2020-21 च्या पूर्वअनुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ अपेक्षित दाखवण्यात आली आहे. तर कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योगात उणे 11.3 टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे 9 टक्के वाढ दाखवण्यात आली आहे. राज्याचा जीडीपी यंदा 5.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - पीक विम्याचे पैसे दिले नाही तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही - भाजप आमदार

पहिल्या सुधारित अंदाजानुसार, 2019-20 चे सांकेतिक स्थूल उत्पन्न 28,18,555 कोटी इतके होते तर 2018 -19 मध्ये हे उत्पन्न 25,19,628 कोटी होते. 2019-20 मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्त्पन्न 21,34,065 कोटी होते तर 2018-19 मध्ये 20,33,314 कोटी होते.

सन 2019-20 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 2,02,130 कोटी होते तर 2018-19 मध्ये 1,87,018 कोटी होते.वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 च्या सांकेतिक स्थळ राज्य उत्पन्नात 1,56,925 कोटी घट अपेक्षित आहे. 2020-21 चे दरडोई राज्य सरकारचे उत्पन्न 1,88,784 अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, महसुली जमा 3,47,457 कोटी तर 2019-20 सुधारित अंदाजानुसार 3,09,881 कोटी आहे.

अर्थसंकल्पीय पाहणी अहवालाचा अंदाज -

अर्थसंकल्पीय पाहणी अहवालाच्या अंदाजानुसार, 2020-21 नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे 2,73,181 कोटी आणि 74,276 कोटी आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 या दरम्यान प्रत्यक्ष महसुली जमा 1,76,450 कोटी अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 50.8% आहे.

हेही वाचा - 'जनता विचारतेय मोदीजी उत्तर द्या'; भाजप कार्यालयासमोर राष्ट्रवादीने लावले पोस्टर

अर्थसंकल्पीय अंदाज 2020-21 नुसार, राज्याचा महसुली खर्च 3 ,56,968 कोटी असून 2019- 20 सुधारित अंदाजानुसार 3,41,224 कोटी आहे. मोठ्या , मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे 20 जून 2019 अखेर 53.04 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आणि 2019-20 प्रत्यक्ष सिचन क्षेत्र 40.52 लाख हेक्टर होते. तर लघु सिंचन प्रकल्पाद्वारे 30 जून 2020 अखेर 19.26 लाख हेक्टर सिचन क्षमता निर्माण करण्यात आली. 2019-20 मध्ये 8.63 लाख हेक्टर 44.8% क्षमतेचा वापर झाला. वार्षिक कर्ज योजनेअंतर्गत 2020-21 मध्ये कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रासाठी वार्षिक लक्ष 93 हजार 626 कोटी होता.

40 हजार 515 कोटी पीक कर्ज वाटप

2020-21 मध्ये डिसेंबर अखेर वित्तीय संस्थेद्वारे 40 हजार 515 कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाले. 2019-20 मध्ये ते 28 हजार 604 कोटी इतकं होतं. 2020-21 मध्ये सप्टेंबर अखेर 30 हजार 14 कोटी रुपये कृषी मुदत कर्ज वाटप करण्यात आलेतर 2019-20 मध्ये 34 हजार 427 कोटी होता.

पशुसंवर्धन क्षेत्रात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असून वने आणि लाकूड तोडणी 5.7 % वाढ अपेक्षित आहे. तसंच मत्स व्यवसाय आणि मत्स शेती 2.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. वस्तू निर्माण उणे 11.8 टक्के, बांधकाम उणे 14.6 टक्के त्याचा परिमाण उद्योग क्षेतात उणे 11.3 टक्के वाढ अपेक्षित आहे.

प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांनी 2019- 20 मध्ये शेतकऱ्यांना एकूण 10 हजार 898 कोटी कर्ज वितरित केले. जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले. पीडित शेतकऱ्यांना कमाल 2 हेक्टर क्षेत्रातीतील शेतपिकांसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये फळ पिकांसाठी 25 हजार प्रति हेक्टर या दराने दोन हफ्तात चार हजार 374.43 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

राज्यातील परदेशी गुंतवणूक

एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2020 थेट परदेशी गुंतवणूक 8,18,522 कोटी झाली आहे. देशातील एकूण गुंतवणूक 27.7 टक्के आहे. 2020-21 मध्ये सप्टेंबरपर्यंत राज्यातील थेट परदेशी गुंतवणूक 27,143 कोटी होती. मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत जून 2020 मध्ये राज्यात 1.13 लाख कोटी गुंतवणूक आणि 2.50 लाखांपेक्षा जास्त अपेक्षित असलेले रोजगार प्रस्तावित आहे. 31 मार्च 2020 राज्यातील वीज निर्मितीची स्थापित क्षमता आणि 2019-20 वीज निर्मिती देशात सर्वाधिक होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.