ETV Bharat / city

Sugar Factories Lease : राज्य सहकारी बँक देणार राज्यातील 10 कारखाने भाडेतत्वावर!

राज्यातील 10 सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर ( 10 co-operative sugar factories on lease ) चालवण्यास देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने ( State Cooperative Bank ) घेतला आहे. त्यासोबत एक सूतगिरणी भाडेतत्त्वावर ( Spinning mill on lease ) देण्यात येणार आहे. तर लातूर जिल्ह्यातील तालुका शेतकरी दालमिल प्रक्रिया संस्था विक्रीस काढण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.

कारखाना
कारखाना
author img

By

Published : May 13, 2022, 3:03 PM IST

मुंबई - राज्यात यंदा उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. अजूनही अनेक जिल्ह्यातील शेतामध्ये लाखो टन ऊस शिल्लक आहे. गाळपाचा प्रश्न कारखान्यांसमोर उभा राहिला आहे. मात्र असे असले तरी सहकार क्षेत्रातील काही कारखाने दिवाळखोरीत निघाले आहेत. राज्यातील दहा सहकारी साखर कारखान्यांनी ( Ten co operative sugar factories ) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सुमारे अकराशे कोटी रुपये बुडवले आहेत. त्यामुळे राज्यातील 10 सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर ( 10 co-operative sugar factories on lease ) चालवण्यास देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने ( State Cooperative Bank ) घेतला आहे. त्यासोबत एक सूतगिरणी भाडेतत्त्वावर ( Spinning mill on lease ) देण्यात येणार आहे. तर लातूर जिल्ह्यातील तालुका शेतकरी दालमिल प्रक्रिया संस्था विक्रीस काढण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.

साखर कारखाने आणि थकवलेली रक्कम? : चल व अचल मालमत्ता विक्रीसाठी/भाड्याने देण्याबाबतची निविदा सूचना सेक्यु. कायदा २००२ नुसार जप्त केलेल्या १० साखर कारखाने, १ सहकारी सूत गिरणीव १ प्रक्रिया संस्था यांच्यासाठी देण्यात आली आहे. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक लिमिटेड मुंबई "सेक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल अँसेटस अॅन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अॅक्ट २००२" नुसार १० सहकारी साखर कारखाने व ०१ सहकारी सूत गिरणी या कर्जदार संस्थांची मालमत्ता भाडयाने देणेसाठी व ०१ प्रक्रिया संस्थेच्या मालमत्तेची विक्रीसाठी मोहोरबंद निविदा बँकेने मागवल्या आहेत.

भाड्याने द्यावयाच्या संस्था : १) गंगापूर सहकारी साखर कारखाना लि., रघुनाथनगर, तालुका - गंगापूर, जिल्हा - औरंगाबाद, 87 कोटी 19 लाख २) विनायक सहकारी साखर कारखाना लि., वैजापूर, जिल्हा-औरंगाबाद, 57 कोटी दोन लाख. ३) जिजामाता सहकारी साखर कारखाना लि. दुसरबीड, ता सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा, 79 कोटी 35 लाख. ४) गजानन सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर, जिल्हा- बीड, 91 कोटी 55 लाख ५) महेश (कडा) सहकारी साखर कारखाना लि., कडा, तालुका- आष्टी, जिल्हा- बीड, 33 कोटी 61 लाख ६) शिवाजीराव पाटील निलंगेकर ससाका लि., अंबुलगा, जि-लातूर, 252 कोटी 68 लाख ७) देवगिरी ससाका लि., फुलंबी, जिल्हा - औरंगाबाद, 41 कोटी 64 लाख. ८) स.म.स्व. बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना लि., वेळा, ता-हिंगणघाट, जिल्हा-वर्धा, 164 कोटी 66 लाख ९) जयकिसान सहकारी साखर कारखाना लि., बोदेगांव, तालुका - दारव्हा, जिल्हा यवतमाळ, 229 कोटी 44 लाख १०) स.म.दत्ताजीराव कदम सहकारी सूत गिरणी लि., कौलगे, ता-गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर दहा कोटी 91 लाख ११) जय जवान जय किसान ससाका लि., नळेगांव, जिल्हा लातूर. 84 कोटी 41 लाख

विक्री करावयाच्या संस्था : १) तालुका शेतकरी दालमिल प्रक्रिया संस्था लि., मलकापूर, ता- उदगिर, जिल्हा - लातूर. या संस्थेची थकबाकी 4 कोटी 86 लाख रुपये आहे. हे कारखाने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढण्यात येणार असून निविदा अर्ज भरण्याची तारीख 19 मे 2022 ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती अनास्कर यांनी दिली आहे.

'साखर कारखानदारी अडचणीत नाही' : यंदा उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे त्यानुसार गाळपाचा हंगामही खूप चांगल्या पद्धतीने चालला आहे अद्यापही ऊस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची वसुली या हंगामात चांगल्या पद्धतीने होईल कारखानदारी या हंगामात अडचणीत नाही असे मतही अनास्कर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - राष्ट्रीय कुटुंब दिवस : 26 जणांचे कुटुंब नांदते गुण्यागोविंदाने, पाहा, दिंडोरीतील आदर्श कुटुंब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.