ETV Bharat / city

ST workers strike : एसटी कर्मचारी संप कायम, आंदोलनाचा १५ दिवस; भाजपकडून शक्ती प्रदर्शन? - ST workers strike agitation

आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानात कांमगारांसमवेत आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला भाजपाने पाठिंबा दिला असून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १०५ आमदार व खासदार मैदानात उतरवणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल म्हटले होते. यामुळे आज आझाद मैदानात भाजपकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटी कर्मचारी संप कायम
एसटी कर्मचारी संप कायम
author img

By

Published : Nov 11, 2021, 2:29 PM IST

Updated : Nov 11, 2021, 10:44 PM IST

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानात कांमगारांसमवेत आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला भाजपाने पाठिंबा दिला असून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १०५ आमदार व खासदार मैदानात उतरवणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल म्हटले होते. यामुळे आज आझाद मैदानात भाजपकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटी कर्मचारी संप कायम

गेल्या दोन दिवसात एसटी महामंडळाकडून ९१८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या गेले कित्येक वर्ष केल्या जात होत्या. त्यातच मंडळाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने ३३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. या संपाचा आज १५ व दिवस असून हा संप चिघळला आहे. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्यामुळे कालपासून एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसात एसटी महामंडळाकडून ९१८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातील २५० डेपोमधून आज एकही बस बाहेर पडली नाही. एसटीच्या बसेस शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.

एसटी कर्मचारी संप कायम
एसटी कर्मचारी संप कायम
भाजपकडून शक्ती प्रदर्शन -

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मुंबईच्या मानखुर्द येथे काल आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पडळकर आणि विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मंत्रालया जवळ आंदोलन केले. त्यावेळी पडळकर आणि दरेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात आणण्यात आले होते. आझाद मैदानात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे १०५ आमदार आणि राज्यातील खासदार आझाद मैदानात पाठिंबा देण्यासाठी येतील असे दरेकर म्हणाले होते. यामुळे आजपासून आंदोलनात भाजपकडून शक्ती प्रदर्शन केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - VIDEO : जिल्हा रुग्णालयाचे कामकाज ठप्प, शिकाऊ डॉक्टर संपावर; डीनच्या राजीनाम्याची मागणी

Last Updated : Nov 11, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.