मुंबई - उच्च न्यायालयाच्या ( Mumbai High Court ) निर्देशानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. 82 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी 46 हजार 662 कर्मचारी कामावर हजर झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटी सेवा लवकरच पूर्ववत होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लालपरी पुन्हा धावत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला ( Maharashtra ST Worker Resume ) आहे.
22 एप्रिलपर्यत रुजू होण्याचे निर्देश - एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासह विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापासून संप पुकारला ( ST Worker Strike ) होता. तसेच, संपकरी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू होण्याच निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत संपकरी कर्मचारी कामावर हजर झाल्यास निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
50 हजारांच्यावर आकडा जाणार - सध्या कामावर रुजू होणार्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 46 हजार 462 वर पोहचली आहेत. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे लांबली आहे. येत्या काही दिवसांत कामावर येणाऱ्यांची संख्या 50 हजारांच्यावर जाण्याचा अंदाज एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.
कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या -
- 7 एप्रिल 114 कर्मचारी
- 8 एप्रिल 53 कर्मचारी
- 9 एप्रिल 743 कर्मचारी
- 10 एप्रिल 361 कर्मचारी
- 11 एप्रिल 557 कर्मचारी
- 12 एप्रिल 1569 कर्मचारी
- 13 एप्रिल 1402 कर्मचारी
- 14 एप्रिल 1243 कर्मचारी
- 15 एप्रिल 1561 कर्मचारी
- 16 एप्रिल 1875 कर्मचारी
- 17 एप्रिल 1564 कर्मचारी
हेही वाचा - INS Vikrant Fraud Case : किरीट सोमैयांची 3 तास चौकशी; बाहेर आल्यानंतर म्हणाले...