मुंबई - उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर 90 टक्केहुन अधिक एसटी कर्मचारी कामावर ( ST workers present at work ) हजर झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यांवर एसटी पुन्हा धावू लागली आहे. सध्या राज्यभरात 31 हजार 498 एसटी फेऱ्या सुरू ( 31 thousand 498 ST rounds started across the state ) असून प्रवासी संख्या 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा ( Great relief to citizens ) मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा ( ST Workers Strike ) राज्यातील सर्वसामान्य जनतेला चांगलाच फटका बसला आहे. आता एसटी पुन्हा धावू लागल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
कामावर येणाऱ्यांची संख्या वाढली : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासह विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापासून संप पुकारला होता. तसेच संपकरी यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर 22 एप्रिल 2022 पर्यत रुजू होण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत मोठा प्रमाणात संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 82 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी 90 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी हजर झाले आहेत. तर उर्वरित कर्मचारी येत्या काही रुजू होण्याची शक्यता आहे. कारण कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्रमुळे लांबली आहे.
उत्पन्न 11 कोटींपेक्षा जास्त : कोरोना पूर्वकाळात एसटी महामंडळाच्या बसेसमधून दररोज 65 लाख प्रवासी प्रवास करत होते. एसटी महामंडळाला प्रवासी वाहतूक येथून प्रत्येक दिवशी 21 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. कर्मचार्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशता सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्देशानंतर 90 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी कामावर हजर झाले आहे. राज्यभरात 31 हजार 498 एसटी फेऱ्या सुरू असून प्रवासी संख्या 20 लाखपर्यत पोहोचली आहे. त्यातून एसटी महामंडळाला 11 कोटी रुपयांचे महसूल मिळत आहे.