ETV Bharat / city

ऐन दिवाळीच्या तोंडावर लाल परीच्या टिकीटात दरवाढ; सर्वसामान्याचा खिशाला लागणार कात्री!

दिवाळी सण हा जवळ आल्यामुळे सर्वत्र नागरिकांची जा-ये मोठ्या प्रमाणात असते, याच कालावधीत एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे आता नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

ST hikes more than 17% on Diwali
ऐन दिवाळीच्या तोंडावर लाल परीच्या टिकीटात दरवाढ; सर्वसामान्याचा खिशाला कात्री!
author img

By

Published : Oct 25, 2021, 6:01 PM IST

Updated : Oct 25, 2021, 10:05 PM IST

मुंबई - सततच्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा तोटा वाढला असून हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने ऐन दिवाळीचा तोंडावर एसटीच्या तिकिटात १७.१७ टक्यांची अधिक वाढ करण्यात आली आहे. ही नवीन दरवाढ आज (सोमवार) मध्यरात्रीपासून महामंडळाच्या सर्व प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. दिवाळी सण हा जवळ आल्यामुळे सर्वत्र नागरिकांची जा-ये मोठ्या प्रमाणात असते, याच कालावधीत एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे आता नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

  • भाडेवाढीस संचालक मंडळाची मंजुरी -

गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागलेला आहे. आता त्यातच सततच्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने एसटीच्या तिकिटात १७.१७ टक्यांची अधिक वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीनुसार शासनाला प्रवास भाडेदर ठरविण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रातील डिझेल, चासीज, टायर व महागाई भत्त्याच्या मुल्यात बदल झाल्याने त्यानुसार येणारे सुधारीत प्रवास भाडेदर लागू करण्यास एसटी महामंडळाचा संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

  • सोमवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ -

सुधारीत प्रवास भाडेदर सोमवारी मध्यरात्रीपासून महामंडळाच्या सर्व प्रवासी वाहतूक सेवांना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकीट आकारणी करण्याचा सूचना एसटी महामंडळातील सर्व विभागांना दिल्या आहेत. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, त्यांना वाहकाने त्या आरक्षण तिकिटाचा जूना तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक त्या तिकीट धारकाकडून वसूल करावयाचा आहे. याशिवाय १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी घेण्यात येणाऱ्या अर्ध्या आकाराची (Half Ticket) सवलत चालू राहिल. तसेच, पालकासोबत असणाऱ्या ५ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवासाची सवलत पूर्वीप्रमाणे चालू राहील.

  • असे असणार नवीन दर -

एसटीने सोमवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ केली. त्यानुसार प्रति टप्पा (६ कि.मी.) साधी मिडी बसचा ७ रुपये ४५ पैसे असणारी नियमित तिकीट आकारणी भाडेवाढीनंतर आता ९ रुपये ७० पैसे होणार आहे. तर रात्रराणी बसची ९ रुपये ७० पैसे, निमआराम - विनावातानुकूलित शयन आसनी १२ रुपये ८५ पैसे असणार आहे, शिवशाही १३ रुपये ३५ पैसे, शिवशाही स्लिपर १४ रुपये ३५ पैसे, वातानुकूलित शिवनेरी १९ रुपये ५० पैसे आणि वातानुकूलित शिवनेरी स्लिपर २३ रुपये असणार आहे. नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असून २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून (२५ व २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे.

  • नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ -

गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

हेही वाचा - VIDEO : समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारे वकील कनिष्ठ जयंत यांच्याशी खास मुलाखात...

Last Updated : Oct 25, 2021, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.