मुंबई - गेल्या ७३ दिवसांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ( ST Workers Strike ) वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना ( ST Corporation Suspended Workers ) बडतर्फ करण्याचे सत्र सुरू केले आहेत. आज ( बुधवारी ) महामंडळाने सर्वाधिक असे १८९ ( 189 Workers Suspended ) निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ३३३ वर पोहचली आहे. याशिवाय आतापर्यत महामंडळाने ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
३ हजार ७९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली आहे. तरी सुद्धा एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे. महामंडळाने आतपर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. महामंडळाने आतापर्यत ३ हजार ७९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजवाली आहे. तर आज १८९ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ३३३ वर पोहचली आहे.
७० आगार संपामुळे बंदच
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातील २५० आगारांपैकी १८० आगार सुरु झाले आहे. तर ७० आगार संपामुळे अजूनही बंद आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील १३ आगार, मुंबई विभागातील ८ आगार, नागपूर विभागातील ९ आगार, पुणे विभागातील ७ आगार, नाशिक विभागातील १७ आगार आणि अमरावती विभागातील १६ आगार असे ७० आगार राज्यभरातील अजूनही बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.