मुंबई - गेल्या एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकऱ्यांवर निलंबनाची आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली. याशिवाय कर्मचारी भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना आता नोकरीत घेण्याची सुरुवात महामंडळाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत एसटी महामंडळाने सांगली, जळगाव आणि धुळे विभागात 50 पेक्षा जास्त प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना ( ST Corporation Recruitment ) नोकरीत घेतले आहे.
जोरदार कारवाई सुरू -
विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या 30 दिवसांपासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर हजर हाेण्याचे आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. राज्यातील जनतेची हाेणारी गैरसाेय टाळण्यासाठी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे वारंवार अवाहन केले. मात्र कर्मचारी दाद देत नसल्यामुळे महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली. महामंडळाने आतपर्यंत राेजंदारीवरील 1 हजार 990 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून 9 हजार 625 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय धुळे, जळगाव येथे प्रतिक्षायादीतील उमेदवारांना कामावर घेण्यास सुरुवात केली असून हे चालक महामंडळात रुजू सुद्धा झाले आहे.
परिवहन मंत्र्यांचा संकेतानंतर भरती प्रक्रिया-
एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. त्यानुसार आता आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली.
चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया -
एसटी महामंडळाने काेराेनामुळे आर्थिक ताेटा वाढल्याने अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्यासाठी 2016-17 व 2019 अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित केली हाेती. काेराेना निर्बंधांत सुट मिळाल्यानंतर ही स्थगिती फेब्रुवारी 2021 मध्ये उठविली. परंतु काेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागू झाल्याने चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया पुन्हा रखडली. एकूण 2 हजार 600 हून अधिक उमेदवार असून यात काहींचे प्रशिक्षण पूर्ण होऊन अंतिम चाचणी हाेण बाकी आहे. तर काही उमेदवार अंतिम चाचणीही होऊन सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
या विभागात होणार भरती-
एसटी महामंडळाच्या कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलढाणा, धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, नागपूर, भंडारा, ठाणे या विभागातील सर्वाधिक चालक कम वाहक पदाचे उमेदवार प्रतीक्षेत आहेत. यातील सांगली, जळगाव आणि धुळे विभागात 50 पेक्षा जास्त प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना नोकरी घेतले आहे.
ST Bus Strike : संपामुळे एसटी महामंडळात नोकर भरती; प्रतीक्षा यादीवरील 50 उमेदवारांना घेतले नोकरीत - एसटी महामंडळ न्यूज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Bus Strike ) आता मिटणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली असून सरकारने कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कामावर येण्याचे आवाहन केले आहे. वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकऱ्यांवर ( ST Employee ) निलंबनाची आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली. एसटी महामंडळाने प्रतीक्षा यादीवरील 50 उमेदवारांना ( ST Corporation Recruitment ) नोकरीत घेतले आहे.