ETV Bharat / city

Wheelchair Basketball Game : व्हिलचेअरवर बसून बास्केटबॉल खेळणारा देशातील सर्वात लहान खेळाडू

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ ( video viral on basketball player ) प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक मुलगा व्हीलचेअरवर बसून बास्केटबॉल ( Wheelchair basketball game ) कसा खेळतात हे शिकत होता. या खेळात नवीनच असल्याने हा मुलगा काहीसा कन्फ्युज झाला होता. पण, त्याची आई त्याला पुढे ढकलत होती. या व्हिडिओला कॅप्शन होतं 'मा का प्यार' भावांनो हा मुलगा काही साधासुधा नाही. या मुलाचं नाव आहे श्रेयस बिरवाडकर आणि हा देशातील सर्वात लहान ( The youngest wheelchair basketball player in the country ) व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू आहे.

Shreyas Birwadkar
श्रेयस बिरवाडकर
author img

By

Published : Jun 19, 2022, 11:47 AM IST

Updated : Jun 19, 2022, 1:56 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ ( video viral on basketball player ) प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक मुलगा व्हीलचेअर बसून बास्केटबॉल ( Wheelchair basketball game ) कसा खेळतात हे शिकत होता. या खेळात नवीनच असल्याने हा मुलगा काहीसा कन्फ्युज झाला होता. पण, त्याची आई त्याला पुढे ढकलत होती. या व्हिडिओला कॅप्शन होतं 'मा का प्यार' भावांनो हा मुलगा काही साधासुधा नाही. या मुलाचं नाव आहे श्रेयस बिरवाडकर आणि हा देशातील सर्वात लहान ( The youngest wheelchair basketball player in the country ) व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू आहे.

: व्हिलचेअरवर बसून बास्केटबॉल खेळणारा देशातील सर्वात लहान खेळाडू

लहानपणापासून दिव्यांग - श्रेयस बिरवाडकरने वयाच्या 10 व्या वर्षीच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा देशातील सर्वात लहान व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये या खेळाचा सराव करत आहे. श्रेयस लहानपणापासूनच दिव्यांग असला तरी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्याच्यात लहानपणापासूनच आहे.

Shreyas Birwadkar, the youngest wheelchair basketball player in the country
श्रेयस बिरवाडकर, देशातील सर्वात लहान व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू

देशासाठी खेळाचे आहे - ईटीव्ही भारतशी बोलताना श्रेयस म्हणाला की, "सुरुवातीला मला वाटलं नव्हतं मी काही करू शकेल. पण, इथे येऊन मला आता भारी वाटतय. सहा महिने झालेत मी सरावाला सुरुवात केलेय. इथे आमच्याकडून व्यायाम करून घेतला जातोय त्यामुळे मला खूप तंदुरुस्त वाटते आहे. व्हीलचेअरवर बसून बास्केट बॉल कसा खेळतात हे मला इथे येऊन कळले. अनेक नवीन मित्र मला याच खेळामुळे मिळाले. या खेळात पारंगत होऊन मला देशासाठी खेळायचे आहे." अशी इच्छा श्रेयसने व्यक्त केली.

व्हिडीओमुळे लोक सेलिब्रिटी म्हणतात - त्याच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात श्रेयस म्हणाला की, "मी नवीनच असल्याने थोडासा कन्फ्युज झालो होतो. कोच सर काहीतरी सांगत होते आणि माझं तिकडे लक्ष नव्हतं. आई सारखी सांगत होती ती कडे लक्ष दे, तिकडे जा म्हणून. पण, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. मग आईनेच मला पुढे ढकलले. या सगळ्याचा व्हिडीओ माझी ताई शूट करत होती आणि तो गंमत म्हणून सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. सध्या या व्हिडिओला 8 मिलीयनहून अधिक लोकांनी पाहिल असून या व्हिडिओमुळे मला लोकं सध्या सेलिब्रिटी सुद्धा बोलतात."

सुरुवातीला भिती होती - श्रेयसच्या या खेळा संदर्भात बोलताना त्याच्या मागे नेहमीच ढाल बनून उभी राहणारी मोठी बहिण रक्षंदा बिरवाडकर म्हणाल्या की, "सहाजिकच सुरुवातीला आम्हाला थोडी भीती होती की श्रेयस तर पुढे कसे होईल. त्यासाठी आम्ही इंटरनेटवर सतत काही ना काही शोधत बसायचो. मग आम्हाला इंटरनेटवर निषा गुप्ता भेटली. निषा गुप्ता या इंटरनॅशनलसाठी खेळल्या आहेत. त्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलय, त्यादेखील व्हिलचेअर बास्केटबॉलपटू आहेत. मग, आमच्या थोड्या अशा पल्लवित झाल्या आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आमच्या श्रेयसला त्यांच्या टीम मध्ये सामावून घेतलं."

भाऊ वेगळी ओळख निर्माण करतोय - रक्षंदा पुढे म्हणाल्या की, "सुरुवातीच्या काळात त्याला व्हीलचेअर चालवताना त्रास व्हायचा. पण, आता हळूहळू तो स्वत: त्याची व्हीलचेअर सांभाळू लागला आहे. आता तो नवीन गोष्टीही शिकत आहे. खेळायला सुरुवात केल्यापासून तो खूप काही शिकला आहे. तो आणखी खूप प्रगती करेल. आता एक बहीण म्हणून मला खूप भारी वाटतंय कारण माझा भाऊ त्याची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतोय."

हेही वाचा - मुंबई पोलीस आयुक्तांनी पोक्सो आणि विनयभंगाच्या तक्रारी विषयीचा 'तो' निर्णय घेतला मागे

श्रेयस नक्की पुढे जाईल - श्रेयसला प्रशिक्षण देणाऱ्या श्रेयसच्या प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉलपटू निषा गुप्ता ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या की, "श्रेयस अजून खूप लहान आहे. तो सर्व काही लवकर शिकतोय. त्याच्याकडे खुप वेळ आहे. मला आशा आहे तो नक्कीच काहीतरी चांगलं करेल. श्रेयस सुरुवातीला इथे आला तेव्हा खूप घाबरला होता. पण, मागच्या सहा महिन्यात त्याने जी प्रगती केले ती अतिशय उत्तम आहे."

कोण आहेत निशा गुप्ता ? - आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉलपटू निषा गुप्ता यांनी 2015 साली बास्केटबॉल खेळण्यास सुरुवात केली. मुंबईत देखील निशा गुप्ता यांनीच त्यांच्या एका सहकार्‍याच्या मदतीने व्हीलचेअर बास्केटबॉलची सुरुवात केली. सुरुवातीला हैदराबादमध्ये खेळायला गेल्या तिथे त्यांना चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळालं. पण, नंतर जेव्हा स्टेट लेवलसाठी त्या खेळायला गेल्या तेव्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक जिंकून आणलं होत. त्यानंतर त्यांनी पाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत भारताला ब्रॉंझ मेडल जिंकवून दिलं होतं.

दरम्यान, श्रेयस अभ्यासातही चांगला आहे. जेव्हा कोरोनामुळे सर्व काही ऑनलाइन होते तेव्हा श्रेयस खेळासाठी बराच वेळ देऊ शकत होता. पण आता तो फक्त शनिवार आणि रविवारीच सराव करतो, जेणेकरून अभ्यास आणि खेळ दोन्हीचा समतोल साधता येईल. सध्या श्रेयस इयत्ता सहावीत असून बास्केटबॉल खेळल्यानंतर तो शाळेतही खूप सक्रिय राहतो.

हेही वचा - मुंबई : विद्युत वाहनांना 'अच्छे दिन'.. पालिका, बेस्टकडून चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरुवात

Last Updated : Jun 19, 2022, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.