ETV Bharat / city

युतीत 'बंड'खोरांची लाट; एकमेकांविरोधात उभे 'ठाक' - बंडखोर उमेदवार

राज्यात युतीचा जागा अदलाबदलीचा तिढा अजूनही कायमच असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. युती होणारच अशी घोषणा केली खरी. मात्र, अशा काही भाजपच्या अधिकृत जागा आहेत जिथे भाजपच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे वरच्यावर दिसणारी युती मात्र अंतर्गत वादामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

सेना - भाजप
author img

By

Published : Oct 4, 2019, 8:45 PM IST

Updated : Oct 4, 2019, 9:12 PM IST

मुंबई - राज्यात युतीचा जागा अदलाबदलीचा तिढा अजूनही कायमच असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. युती होणारच अशी घोषणा केली खरी. मात्र, अशा काही भाजपच्या अधिकृत जागा आहेत जिथे भाजपच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे वरच्यावर दिसणारी युती अंतर्गत वादामुळे चर्चेचा विषय बनली आहे. कणकवलीमध्ये तर राणेंविरोधात शिवसेनेने थेट उमेदवारच उभा केला आहे. त्यामुळे कोकणात राणेविरुद्ध सेना असा संघर्ष येत्या काळात पेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

भाजपच्या नितेश राणेंविरुद्ध सेनेचे सतीश सावंत रिंगणात

कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे भाजप-सेनेची युती असतानाही शिवसेनेने स्वतःचा अधिकृत उमेदवार नितेश राणेंविरुद्ध रिंगणात उतरवला आहे. येथे शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

कल्याण पूर्वमध्ये भाजपविरोधात सेनेचा बंडखोर उमेदवार -

कल्याण पूर्व मतदारसंघ युतीमध्ये भाजपला देण्यात आला आहे. त्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी शक्तिप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मुक्ताईनगरमध्ये भाजपविरोधात सेनेचे जिल्हाप्रमुख रिंगणात -

मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपकडे असून येथे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक नाराज होऊन शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

हेही वाचा - विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन

गेवराईत भाजप उमेदवाराविरोधात सेनेचा बंडखोर उमेदवार -

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघ हा भाजपकडे आहे. येथून भाजपने अॅड. लक्ष्मण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे येथील शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कसब्यात टिळकांविरोधातही सेना बंडखोर उमेदवार मैदानात -

पुण्यातील कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे भाजपने मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, येथे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पनवेलमध्ये भाजपविरोधात शिवसेनेचा बंडखोर -

पनवेल मतदारसंघ हा युतीत भाजपकडे आहे. येथे प्रशांत ठाकूर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथेही बंडखोरी करत शिवसेनेचे बबन पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

रामटेक मतदारसंघ -

नागपूरमधील रामटेक मतदारसंघ हा युतीत भाजपकडे आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथील शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा - पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक

यवतमाळ मतदारसंघ -

यवतमाळ मतदारसंघातही बंडखोरी पहायला मिळाली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख आणि गेल्या वेळेसचे शिवसेनेचे उमेदवार संतोष ढवळे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत संतोष ढवळे यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भाजपचे मदन येरावार 1227 मतांनी विजयी झाले होते. यावेळी या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र, युतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. त्यामुळे शिवसैनिकामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संतोष ढवळे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे मदन येरावार यांचे विजयाचे गणित बिघडू शकते.

हेही वाचा - 'आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा

वणी विधानसभा -

वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, ही जागा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे याठिकाणी सेनेच्या विश्वास नांदेकर यांनी बंडखोरी करून भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकूलवार यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 4, 2019, 9:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.