ETV Bharat / city

Deputy Cm Devendra Fadnavis ; देवेंद्र फडणवीसांवर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची नामुष्की, अमित शाहांनी छाटले पंख ? - देवेंद्र फडणवीसांवर ओढवली नामुष्की

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पतन झाल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची नामुष्की ओढवली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांचे पंख छाटल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Deputy Cm Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 1, 2022, 1:58 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणा केली. या नव्या सरकारमध्ये आपण कोणतेही पद घेणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले होते. मात्र पुढील दोन तासातच दिल्लीतून चक्र फिरल्याने देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची नामुष्की ओढवली. देवेंद्र फडणवीस यांचे वाढते राजकीय वजन पाहता दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांचे पंख छाटले अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी दिला धक्का - राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्यात देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्षानंतर यश आले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने फडणवीस यांनी हा करिश्मा केला. महाविकास आघाडी सरकारच्या पतनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, अशी आशा जवळपास सर्वांना होती. मात्र राजभवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करुन देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच धक्का दिला. मात्र आपण कोणतेही पद न घेता या सरकारला सहकार्य करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र काही मिनीटातच देवेंद्र फडणवीस यांना आपला हा निर्णय बदलण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली.

दोन तासात दिल्लीतून फिरली सूत्र - देवेंद्र फडणवीस हे कोणतेही पद घेणार नाहीत. नवीन सरकारला बाहेर राहून मदत करणार अशी घोषणा केल्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून सूत्रे हलायला सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देवेंद्र फडणीस यांनी राजभावनांमध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली असली, तरी त्यानंतर पुढील दोन तास दिल्लीत वाऱ्याच्या वेगाने चक्रे फिरू लागली होती. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत शपथ घ्यावी लागेल, यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला.

उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा दबाव - दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींकडून उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी दबाव होता. त्यामुळे इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश म्हणून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागल्याचे मत विजय चोरमारे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष ही प्रत्येक गोष्ट रणनीती ठरवून करत असते. मात्र अनपेक्षितपणे पक्षश्रेष्ठी अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतील याची जराही कल्पना देवेंद्र फडणवीस यांना नव्हती. त्यामुळे अनपेक्षितपणे घेतलेल्या या निर्णयावर नेमके काय करावे अशी गोची देवेंद्र फडणीस यांची झाली. मात्र पक्षाच्या आदेशामुळे त्यांचा नाईलाज असल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले अशीही चर्चा आता सुरू आहे.

देवेंद्र फडणीस यांचे दिल्लीतील वजन कमी करण्याचा घाट - देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या गोटातील एक मुरब्बी राजकारणी मानले जातात. आजपर्यंत महाराष्ट्रात खेळलेल्या अनेक राजकीय रणनीती त्यांनी यशस्वी ठरवल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत अनपेक्षितपणे घेतलेली फारकत वगळता त्यांनी आजपर्यंत केलेल्या सर्वच रणनीती फळाला आलेली पाहायला मिळाली. खास करून नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ नसतानाही आपले उमेदवार निवडून आणण्याचा चमत्कार देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला. फक्त 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेतून पायउतार झाले असले तरी, एकही आमदार त्यांनी आपल्या पक्षातून फुटू दिला नाही. एवढेच काय तर अपक्ष आमदारही विरोधी पक्षाला सोडून गेले नाहीत.

देवेंद्र फडणवीसांमुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी चिंतित - देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व कौशल्य दिवसेंदिवस वाढतच गेलेले पाहायला मिळाले. या सर्व कारणांमुळे दिल्लीतही सातत्याने त्यांचे राजकीय वजन वाढत राहील. तसेच देवेंद्र फडणवीस हे नेहमीच संघाच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या राजकीय वजनामुळे दिल्लीतील अनेक नेते चिंतित आहेत. आगामी काळात देवेंद्र फडणवीस अनेकांसाठी पर्याय ठरू शकतील याची जाण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद अनपेक्षित देण्याचा डाव रचला असल्याचे देखील विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.

शरद पवारांचा देवेंद्र फडणीस यांना टोला - मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणारे हे देवेंद्र फडणवीस पहिलेच असा टोला शरद पवार यांनी त्यांना लगावला आहे. मात्र भारतीय जनता पक्षात आलेल्या आदेशाचे पालन करावेच लागते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. मात्र ही शपथ घेत असताना त्यांची देहबोली आणि चेहरा आनंदी नसल्याचे सांगत होते. केवळ संघ्याच्या संस्कारामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले असा टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे. शरद पवार हे देशातले मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांना अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री बनवून राष्ट्रीय पातळीवर त्यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे शरद पवारांनी देखील अगदी अचूक हेरले आहे.

देवेंद्र फडणवीस अमित शाह यांना प्रतिस्पर्धी - देवेंद्र फडणवीस यांची गेल्या काही वर्षांची राजकीय वाटचाल पाहता देशाच्या राजकारणावर त्यांचा कुठेतरी ठसा उमटत होता. विरोधी पक्षनेते पदावर असताना देखील राज्य सरकारला सळो की पळो करून सोडणारा नेता म्हणून देवेंद्र फडणीस यांची ओळख होत होती. त्यातच त्यांनी केलेल्या सर्व रणनीती यशस्वी ठरत होत्या. देवेंद्र फडणवीस यांची संघाशी असलेली जवळीक एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानांच्या शर्यतीत असणाऱ्या अमित शाह यांना धोक्याची होती. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानांच्या शर्यतीत अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतले जाते. मात्र या दोघांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस पुढे जाऊ शकतील, याची भीती अमित शाह यांना होती. त्यामुळेच अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांचे पंख छाटण्याचे काम दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आल्याचे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.