ETV Bharat / city

Rajya Sabha Election : अपक्ष आमदार ठरणार 'गेम चेंजर'; महाविकास आघाडी की 'भाजप' कोण साधणार टायमिंग - महाविकास आघाडी सरकार

राज्यसभेच्या निवडणुकीची 10 जून तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा अपक्षांचा भाव वधारत आहे. महाराष्ट्रातून 6 खासदार निवडून जाणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष यांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यांची मते मिऴविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र अपक्षांची मतं या निवडणुकीत 'गेम चेंजर' ठरणार आहेत.

Independent MLA Role
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 9, 2022, 1:10 PM IST

Updated : Jun 9, 2022, 2:30 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. हक्काची मते फुटू नयेत, यासाठी पक्षाच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. छोटे आणि अपक्ष आमदारांकडे या निवडणुकीचा फोकस असणार आहे. हे आमदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार, त्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपचे नेतेही कामाला लागले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांचा वधारला भाव - राज्यसभेच्या निवडणुकीची 10 जून तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा अपक्षांचा भाव वधारत आहे. महाराष्ट्रातून 6 खासदार निवडून जाणार आहेत. राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी आमदारांना 42 मते आवश्यक आहेत. पक्षाच्या आमदारांची मते फुटू नये, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता इतर छोटे पक्ष आणि अपक्ष यांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यांची मते मिऴविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी गाठीभेटी सुरू झाल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे.

अपक्षांनी भूमिका बदलल्यास बसणार फटका - शिवसेनेकडे 56 मते आहेत. या एकूण मतांमधून संजय राऊत हे पहिल्या पसंतीचे उमेदवार निवडून जाणार आहेत. शिवसेनेने दिलेले संजय पवार या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारासाठी शिवसेनेची हक्काची 14 मते शिल्लक राहतात. त्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसची शिल्लक राहिलेली दोन मते आणि राष्ट्रवादीची शिल्लक राहिलेली 12 मते शिवसेनेला मिळू शकतात. शिवसेनेची उरलेली 14, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 16 मते मिळून 28 मते शिल्लक राहतात. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी 14 मतांची गरज आहे. त्यातही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची एकूण 16 मते आहेत. ही मते सेनेच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. मात्र ऐनवेळी छोटे पक्ष आणि अपक्ष यांनी भूमिका बदलल्यास मोठा फटका बसू शकतो.

महाविकास आघाडीने बोलावलेल्या बैठकीला मंत्र्यांचीच दांडी - महाविकास आघाडीने बोलावलेल्या बैठकीला 16 पैकी 11 आमदार उपस्थित होते. त्यामध्ये गीता जैन, देवेंद्र भुयार, आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, नरेंद्र भोंडकर, शामसुंदर शिंदे, संजय शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल आणि राजकुमार पटेल हे अपक्ष या सर्व आमदारांनी एकमताने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. उर्वरित पाच आमदारांपैकी बहुजन विकास आघाडीच्या तीन, बच्चू कडू व रासपचे एक आमदार उपस्थित राहिले नव्हते. बच्चू कडू सरकारमध्ये मंत्री आहेत. तर उर्वरित चार मते कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. मनसेचे एकमेव मत कोणाला जाणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपला 13 मतांची गरज - भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष धरून 113 मते भाजपाकडे आहेत. भाजपचे राज्यसभेसाठी पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे हे उमेदवार सहज निवडून जावू शकतात. तिसऱ्या पसंतीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपला 13 मतांची गरज भासणार आहे. भाजप हे संख्याबळ कसे गाठणार.? घोडेबाजार होणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Jun 9, 2022, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.