मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात 94 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दर दिवशी चोरी, दरोडा, फसवणूक सारखे गुन्हे घडत असतात. 2020 या वर्षामध्ये मुंबईत दरोड्याचे 15 गुन्हे घडले. यामध्ये 14 प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. रॉबरीचे तब्बल 535 गुन्हे घडले असून यामध्ये 161 गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच मुंबई शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 2020 या वर्षामध्ये चोरीचे 3433 गुन्हे घडले आहेत. यामध्ये 1195 गुन्ह्यांचा तपास लावत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. वाहन चोरीचे 2801 गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये 1085 वाहन चोरीचे गुन्हे उघड करत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
26 वर्षापुर्वी चोरी झालेला माल केला परत-
रेल्वे पोलिसांनी चोरी झालेल्या मालाचा तपास करत असताना बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार क्लाईव्ह डिसोझा यांची 26 वर्षापूर्वी 5 ग्राम सोन्याची साखळी चोरी झाली होती. मात्र 26 वर्षानंतरही या प्रकरणाचा छडा लावत 5 ग्रॅम सोन्याची साखळीची रिकव्हरी केली. तसेच साखळी त्याच्या मूळ मालकाला परत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बोरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 वर्षापूर्वी तक्रारदार रमेश पटेल यांचा 2020 नग कच्चे हिरे चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी 19 वर्षानंतर ते पुन्हा मिळवून मूळ मालकाला परत केलेले आहेत.
हेही वाचा- टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर
हेही वाचा- औरंगाबादेत मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी ठिय्या आंदोलन