ETV Bharat / city

राज्यातील प्रत्येक गावात १६ नोव्हेंबरला होणार 'विशेष ग्रामसभा' - १६ नोव्हेंबरला होणार 'विशेष ग्रामसभा'

गावातील नागरिकांची जनजागृती करून मतदार यादी पुर्नरिक्षण करण्यासाठी ही ग्रामसभा घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी १ जानेवारी या अर्हता दिनांकानुसार कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार यंदाही या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून मतदार याद्यांची पडताळणी आणि दुरुस्ती करून त्रुटी काढून टाकण्यात येणार आहेत.

मंत्रालय
मंत्रालय
author img

By

Published : Oct 26, 2021, 4:49 PM IST

मुंबई - मतदार याद्यांची पडताळणी आणि दुरुस्ती करण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. गावातील नागरिकांची जनजागृती करून मतदार यादी पुर्नरिक्षण करण्यासाठी ही ग्रामसभा घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी १ जानेवारी या अर्हता दिनांकानुसार कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार यंदाही या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून मतदार याद्यांची पडताळणी आणि दुरुस्ती करून त्रुटी काढून टाकण्यात येणार आहेत.

कोणाची होणार नोंदणी?

विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासण्यासाठी आणि नवीन मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान राबवले जाते. यानुसार १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांची नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

केव्हा होणार ग्रामसभा?

प्रत्येक गावांमध्ये मतदार यादीच्या चावडी वाचनाचा उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात येत होती. हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुलभरित्या पोहोचावा याकरीता आता विशेष ग्रामसभेचे आयोजन प्रत्येक गावात करण्याची विनंती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना केली आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या १६ नोव्हेंबर रोजी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

कशी असणार नोंदणी?

ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे जाहीरपणे वाचन करण्यात येईल. तसेच सर्व नागरिकांना मतदार यादीतील नोंदी तपासून घेण्यासाठी सांगण्यात येणार आहेत. मतदार यादीतील नोंदीबाबत हरकती असल्यास, नोंदीमध्ये दुरुस्ती करायची असल्यास किंवा नव्याने नाव नोंदवायचे असल्यास विहित नमुन्यातील अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामसेवक किंवा संबंधित गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांना मदत करणार आहेत. यावेळी नागरिकांना मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदार यादी बाबतचे कामकाज कसे चालते याची माहिती सुद्धा केंद्रस्तरीय अधिकारी उपलब्ध करून देणार आहेत. या विशेष ग्रामसभेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत.

हेही वाचा - आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस बंधनकारक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.