मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईच्या सिल्वर ओक ( Silver Oak Attack ) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करते? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती मिळते. मात्र, पोलीस यंत्रणेला एवढ्या आक्रमक आंदोलनाची कल्पना नव्हती का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखेकडून 4 एप्रिल रोजी कायदा व सुव्यवस्था ( Mumbai Special Branch Letter On Silver Oak Attack ) सह आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना ( Vishvas Nagre Patil ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Home ) यांचे निवासस्थान सिल्वर ओक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Home Matoshri ) यांचे निवासस्थान मातोश्री आणि शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे उग्र आंदोलन होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता. तसेच सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री यांचे शासकिय निवासस्थान, वांद्रे येथील खाजगी निवासस्थान, उच्च न्यायालय, सिल्वर ओक मुंबई याठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
पत्रात नेमकं काय? - उपरोक्त विषयास अनुसरून 'एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरन करण्यात यावे, या मागणीसाठी एस. टी. कर्मचान्यांनी राज्यव्यापी संप व आंदोलन १० नोव्हेबंर 2021 पासून आझाद मैदान, मुंबई येथे सुरु केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली 10 नोव्हेंबर 2021 ते 24 नोव्हेंबर 2021 दरम्यान, ठिय्या आंदोलन सुरू होते. तर 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन सुरू होते. मा. उच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख 5 एप्रिल 2022 असून सध्या आझाद मैदान मध्ये 1500 ते 1600 पुरुष व महिला आंदोलनकर्ते आहेत. तसेच आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनीकरण वा निर्णय एस. टी. कर्मचारी यांच्या विरुद्ध लागण्याची जाणीव एस. टी. कर्मचारी यांना झालेली आहे. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी 4 व 5 एप्रिल 2022 रोजी सिल्वर ओक, मातोश्री बंगला याठिकाणी आंदोलन करण्याचा धमकिवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एस.टी. कर्मचारी हे खासगी वाहनाने किंवा रेल्वेने येण्याची शक्यता आहे. खासगी वाहनाने मुलुंड चेक नाका, वाशी चेक नाका व दहिनर चेक नका येथून प्रवेश करणार असून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावा. आंदोलक त्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने आंदोलक आझाद मैदान, मंत्रालय, मातोश्री बंगला, वर्षा बंगला सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री यांचे शासकिय निवासस्थान, वांद्रे येथील खासगी निवासस्थान, उच्च न्यायालय, सिल्वर ओक मुंबई याठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा विशेष शाखेने दिला होता.
Silver Oak Attack : सिल्वर ओक हल्ल्यासंदर्भात विशेष शाखेने 4 एप्रिलरोजीच दिला होता इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Silver Oak Attack ) यांच्या मुंबईच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता विशेष शाखेकडून 4 एप्रिल रोजी ( Mumbai Police Special Branch Letter On Silver Oak Attack ) कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नागरे पाटील ( Vishvas Nagre Patil ) यांना या हल्यासंदर्भात इशारा देण्यात आला होता, अशी माहिती पुढे आली आहे.