ETV Bharat / city

Interview With Prithviraj Chavan : देशात मोदी सरकारची दडपशाही, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप; पाहा खास मुलाखत - Interview With Prithviraj Chavan

राज्यात शिंदे व फडणवीस सरकार येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्यमंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारची दडपशाही यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे देशभर होत असलेल्या आंदोलनाला चिरडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. ( Congress Movement Against Inflation ) तर दुसरीकडे शिंदे गटाच्या अपात्र आमदारांचा पेच सर्वोच्च न्यायालयात अडकलेला आहे. या सर्व विषयांवर राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी -

Prithviraj Chavan alleged Repression Modi government
पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Aug 6, 2022, 8:00 AM IST

Updated : Aug 6, 2022, 11:55 AM IST

मुंबई - राज्यात शिंदे व फडणवीस सरकार येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्यमंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारची दडपशाही यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे देशभर होत असलेल्या आंदोलनाला चिरडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. ( Congress Movement Against Inflation The Country ) तर दुसरीकडे शिंदे गटाच्या अपात्र आमदारांचा पेच सर्वोच्च न्यायालयात अडकलेला आहे. या सर्व विषयांवर राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी -

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचित करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

प्रश्न - आज देशभरात वाढती महागाई, बेरोजगारी, मोदी सरकारची दडपशाही याच्याविरोधात काँग्रेसकडून शांततेत आंदोलन करण्यात येत होते. परंतु, राज्यात मुंबईत तसेच बऱ्याच ठिकाणी याला केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला?

पृथ्वीराज चव्हाण - केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तसा संदेश गेलेला आहे. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी व हे आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात यावे अशा पद्धतीचा संदेश केंद्र सरकारकडून विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गेला. परंतु हे आंदोलन आम्ही कशासाठी करत आहोत हे समजून घेतले पाहिजे. आज देशात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. केंद्र सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेल आहे. ही चूक आता त्यांना लक्षात आली आहे आणि म्हणूनच यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. परंतु, आज पहाटेपासून आमच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. फक्त मुंबईतच १० हजार कार्यकर्त्यांना नोटीस पाठवून त्यांना अटक करण्यात आली. आमच्या वरिष्ठ नेत्यांना विधान भवनातून तर मला हँगिंग गार्डन येथून ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकार का, घाबरते आहे हे मला समजत नाही. मुख्यमंत्री केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे निर्णय घेत आहेत हे चुकीचे आहे.

हेही वाचा - congress agitation : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू

प्रश्न - एकीकडे देशभरात महागाईने उच्चांक गाठलेला असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या महागाई वाढलेली नसल्याचे सांगत आहेत. त्याचबरोबर भाजपचे नेतेसुद्धा महागाई विरोधात बोलायला तयार नाहीत?

पृथ्वीराज चव्हाण - हा विरोधाभास आहे. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने विविध पद्धतीने आंदोलन करत आहोत. ही अघोषित आणीबाणी आहे. आमच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना नोटीसा पाठवण्याचे काम हे सरकार करत आहे. घरातून बाहेर पडायचे नाही. आंदोलन करायची नाहीत. शांततेच्या मार्गाने घरातून बाहेर पडून आंदोलन जरी केले तरी तुरुंगात जावे लागत आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहे. लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम सध्या काँग्रेस करत आहे. परंतु, मोदी सरकार दडपशही मार्गाने ते चिरडण्याचं काम करत आहे.

प्रश्न - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल चे भाव कमी झाले. तरीसुद्धा महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाच्या दरामध्ये कमी होताना दिसत नाही, याला नेमकं कारण काय आहे?

पृथ्वीराज चव्हाण - 2014 साली आमचे सरकार गेले तेव्हा ज्या किमती होत्या व आताच्या किमती याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. परंतु आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स लावला नव्हता. मोदी सरकारने 2014 नंतर वाढवलेल्या विविध करांमुळे 28 लाख कोटी त्यांना भेटले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे भेटून सुद्धा महागाई, बेरोजगारी कमी झालेली नाही. अग्निपथ योजना कशासाठी आहे. सैन्याचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत म्हणून अग्निपथ सारखी योजना केंद्र सरकारने आणली आहे.

हेही वाचा - Congress Leaders Detained : राहुल गांधी, प्रियंकासह काँग्रेसचे अनेक नेते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

प्रश्न - सध्याच्या मंत्रिमंडळात फक्त दोन मंत्री आहेत. परंतु आर्टिकल 164 घटनेप्रमाणे कमीत कमी 12 मंत्री असणे आवश्यक आहेत, याला तुम्ही कसे बघता?

पृथ्वीराज चव्हाण - हा बदल माननीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केला होता. घटनेच्या आर्टिकल 164 /1(A) प्रमाणे विधानसभा सदस्यांच्या संख्येच्या 15 टक्के पेक्षा जास्त मंत्री नको असे सांगितले होते. परंतु त्याचबरोबर किमान 12 मंत्री असावे असेही सांगण्यात आले होते. याचा अर्थ किमान 12 मंत्री तरी मंत्रिमंडळात हवेत. परंतु ज्या पद्धतीने शिंदे व फडवणीस हे दोनच मंत्री राज्याचं काम पाहत आहेत, त्या अनुषंगाने हे चुकीचं असून आर्टिकल 164/1(A) घटनेचे उल्लंघन असूनही घटना कशासाठी अस्तित्वात आणली? त्याचा काय उपयोग आहे? सरकारचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा. जे 40 आमदार शिंदे गटाबरोबर गेले आहेत त्या प्रत्येकाला कॅबिनेट मंत्री पद हव आहे. हे एक मोठं कोडं असून ते सोडवण्यात भाजपला यश येणार नाही. म्हणून भाजप कडून गुजरात पॅटर्नची भाषा वारंवार वापरली जात आहे.

प्रश्न - महिना उलटून गेला तरी मुख्यमंत्री नंदनवन बंगल्याहून वर्षा बंगल्यावर गेलेले नाही आहेत. परंतु त्यांच्या नावाची पाटी तयार झाली आहे?

अपात्र बंडखोर आमदारांच्या बाबतीत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला, हॉटेल कुठे जायला हवे तिथे जावे. ज्याला पाहिजे त्याला वाय सेक्युरिटी दिली जात आहे. त्यांनी कुठूनही सरकार चालवल त्याच्यावर आमचा आक्षेप नाही. परंतु त्यांनी सरकार चालवायला पाहिजे. लोकांचे हाल होत आहेत. दोन जोडी सरकार चालले आहे व हे किती दिवस चालणार? वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावली आहे ती एक सरकारी प्रक्रिया आहे. त्यावर आमचा आक्षेप असायचं कारण नाही. परंतु हे सरकार पडण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी बंगल्यात स्थलांतरित व्हावे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Priyanka Gandhi Detain : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसच आंदोलन; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Last Updated : Aug 6, 2022, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.