मुंबई - राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज उमेदवार निवडीसाठी समिती गठीत केली. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आदेशाने ही समिती गठीत केली असल्याचे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांनी एका प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधियांवर या समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या समितीत एकूण सहा जणांचा समावेश असून यात सिंधिया यांच्यासोबत सदस्य म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिष चौधरी काँग्रेसचे सरचिटणीस आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनिकम टागोर आणि के. सी. पाडवी यांचा या समितीत समावेश आहे.