ETV Bharat / city

Sonu Nigam Padma Shree Awards : पद्मश्री सोनू निगमचे संगीत क्षेत्रातील योगदान - सोनू निगम पद्मश्री पुरस्कार

सोनू निगम यांच्याविषयी सांगायचे तर त्यांनी अनेक बॉलिवूड गाण्यांना आवाज दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी कन्नड़, उड़िया, पंजाबी, बंगाली, मराठी या भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. त्यांनी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. शाहरूख ते सलमान यासाऱख्या स्टार्सनां त्यांनी आवाज दिला आहे.

Song Nigam Padma Shree
Song Nigam Padma Shree
author img

By

Published : Jan 25, 2022, 10:03 PM IST

Updated : Jan 26, 2022, 12:09 AM IST

मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या (Republic day 2022) पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कार्थींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ गायिका सुलोचना दीदी आणि बॉलिवूड गायक सोनू निगम (Soun Niagm) यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोनू निगम यांच्याविषयी थोडसं..

सोनू निगम यांच्याविषयी सांगायचे तर त्यांनी अनेक बॉलिवूड गाण्यांना आवाज दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी कन्नड़, उड़िया, पंजाबी, बंगाली, मराठी या भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. त्यांनी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. शाहरूख ते सलमान यासाऱख्या स्टार्सनां त्यांनी आवाज दिला आहे.

48 वर्षीय सोनू निगम गायक होण्याबरोबरच संगीत दिग्दर्शक व सेलिब्रिटी जज सुद्धा आहे. बॉलीवूडचा दिग्गज गायक सोनू निगमच्या सुरेल आवाजाचा तरुणाईमध्ये खूप मोठा चाहता वर्ग आहे. 30 जुलै 1973 रोजी फरीदाबाद येथे जन्म झालेल्या सोनू निगम यांनी या क्षेत्रात खूप संघर्ष व मेहनत करून आजची जागा मिळवली आहे. लहानपणापासून त्यांची संगीत क्षेत्राचे आकर्षण होते.

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमने हिंदीशिवाय कन्नड, ओडिया, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगू, मराठी, नेपाळी, मल्याळम, कन्नड, भोजपुरीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. चित्रपटांसोबतच सोनू निगम यांनी अनेक अल्बममध्येही काम केले आहे.

सोनू नियम यांनी गाण्याबरोबरच काही हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. चित्रपटात सोनू निगम यांनी पाच हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. सोनू निगमला ‘आधुनिक रफी’ आणि ‘द लॉर्ड ऑफ कॉर्ड्स’सोबतच ‘मेलोडी मास्टर’ आदि नावांनी ओळखले जाते.

सोनू निगमने तीन दशकाच्या आपल्या संगीत करिअरमध्ये जवळपास 320 चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. सोनू निगमला आतापर्यंत दोन वेळा फिल्म फेअर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. 'कल हो ना हो' चित्रपटातील टायटल ट्रॅकसाठी सोनूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

त्याचबरोबर 2012 मध्ये आलेला चित्रपट अग्निपथमधील गाणे "अभी मुझ में कहीं" सोनू निगमच्या आवाजातील गाणे खूप हिट ठरले होते. सोनू निगमला आयफा आणि फिल्मफेयर पुरस्कारही मिळाले आहेत. सोनू निगम सध्या आपल्या कुटूंबासमवेत दुबईत आहे. नुकताच सोनू निगम परिवारासह कोरोना संक्रमित झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली होती.

Last Updated : Jan 26, 2022, 12:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.