ETV Bharat / city

तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे कठीण - सचिन सावंत - mumbai story

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी "मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, अशी सीमा भागातील जनतेची मागणी आहे. तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित घोषित करावे," असे विधान केले होते. या विधानाचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला आहे.

सचिन सावंत
सचिन सावंत
author img

By

Published : Jan 28, 2021, 5:14 PM IST

Updated : Jan 28, 2021, 8:43 PM IST

मुंबई - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी "मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, अशी सीमा भागातील जनतेची मागणी आहे. तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित घोषित करावे," असे विधान केले होते. या विधानाचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव उघड झाला आहे. परंतु भाजपाने मुंबईकडे वाकड्या नजरेने जर पाहिले तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल, असा संतापजनक इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

सचिन सावंत

मुंबईला बदनाम करण्याचे भाजपाचे षडयंत्र-

यासंदर्भात सावंत म्हणाले की, लक्ष्मण सवादी यांच्या विधानातून मोदी सरकारचा कुटील डाव स्पष्ट झालेला आहे. मुंबईला कमकुवत व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र राहिले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये हलविले. मुंबईतील उद्योगधंदे व प्रकल्प गुजरात व इतरत्र हलवण्याचे काम मागील सहा वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरु आहे. तरी देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प बसून आहे.

भाजपाचा कुटील डाव -

मुंबईला केंद्रशासित करण्याचा हा डाव आहे. सीबीआय, एनसीबी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांकडून येथील उद्योग- व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. बॉलिवूडचाही छळ मांडला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी केलेले प्रयत्न, हे असेच सुरु झालेले नाहीत. या घटनातून भाजपाचा कुटील डाव सुरु होता, हे स्पष्ट दिसते.

नरेंद्र मोदी व भाजपाला महाराष्ट्राबद्दल इतका आकस का आहे, हा प्रश्न विचारून १०५ हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. तसेच मुंबईची जनता भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे सावंत म्हणाले.

हेही वाचा- केंद्राच्या अर्थसंकल्पाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम - अर्थमंत्री अजित पवार

हेही वाचा- प्रक्षोभक भाषण आणि टोलनाका तोडफोडप्रकरणी राज ठाकरेंना वॉरंट

Last Updated : Jan 28, 2021, 8:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.