ETV Bharat / city

Road Potholes In Bhiwandi : भिवंडीत पुन्हा खड्ड्याने घेतला दुचाकीचालकाचा बळी; मृत्यूची संख्या चारवर - Road Potholes In Bhindi

कामवारी नदीच्या पुलावरील एका खड्ड्यात दुचाकी आदळून वृद्धाचा मृत्यू ( old man died ) झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहर,( Bhiwandi City ) ग्रामीण भागात खड्यामुळे आतापर्यत चार नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत.

Bhiwandi
भिवंडी
author img

By

Published : Aug 8, 2022, 6:42 PM IST

ठाणे : भिवंडी - वाडा महामार्गावरील ( Bhiwandi Wada Highway ) कामवारी नदीच्या पुलावरील एका खड्ड्यात दुचाकी आदळून वृद्धाचा मृत्यू ( old man died ) झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहर,( Bhiwandi City ) ग्रामीण भागात खड्यामुळे आतापर्यत चार नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. अशोक काबाडी (वय ६५ रा. कवाड , ता. भिवंडी ) असे खड्यामुळे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे

भिंडीतील रस्त्यावर खड्डे

छातीवरून ट्रकचे चाक गेले - भिवंडी - वाडा महामार्गासह कामवारी नदीच्या पुलावर खड्ड्याचे साम्राज्य पाहवयास मिळत आहे. अशातच रविवारी सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास कवाड गावात रहाणारे अशोक काबाडी ( Ashok Kabaddi ) हे त्यांची मुलगी आदिती (वय २५) असे दोघे कवाडहुन भिवंडीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. याच सुमाराला कामवारी नदीच्या ( Kamwari River ) पुलावरील एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदल्याने ते खाली पडले. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अशोक यांच्या पोट, छातीवरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हा दाखल- या घटनेप्रकरणी आदिती हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे निजामपुरा पोलीस ठाण्यात ( Nizampura Police Station ) ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघाताच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातारण पसरले असून त्यांनी खड्डे दुरुस्तीची मागणी करत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून खड्डे दुरुस्तीचे निवदेन देऊन मागणी करण्यात येत आहे. मात्र अध्यापही ग्रामीण व शहरी भागातील खंड्याची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासन आणखी किती नागरिकाचे खड्यामुळे बळी घेतल्यानंतर खड्डे दुरुस्ती करणारा असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

हेही वाचा - MH cabinet Expansion :अखेर ठरलं! 'या' दिवशी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

रस्त्यांवरील खड्यांची खड्डे जैसे थे - विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंना ( Chief Minister Eshinde ) एका बस चालकाने खडयामुळे होणाऱ्या अपघाताची समस्या मांडून सोशल मीडियावर व्हायरल केली होती. या व्हिडीओमध्ये बस चालक बोलतो कि, शिंदे साहेब अख्खी भिवंडी खड्यात गेली हो, जर लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब, मात्र त्याचा आजपर्यत काहीच परिमाण झाल्याचा दिसून येत नसून आजही भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्यांची खड्डे जैसे थे आहेत.

हेही वाचा - TET Scam in Maharashtra : मला बदनाम करण्याचे षडयंत्र : टीईटी प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.