ETV Bharat / city

लसीकरणात महिला पिछाडीवर! आतापर्यंत 71 लाख 54 हजार 556 महिलांनी घेतली लस

लसीकरणासाठी पुरुष मोठ्या संख्येने पुढे येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आतापर्यंत झालेल्या 1 कोटी 96 लाख 18 हजार 850 लाभार्थ्यांपैकी 83 लाख 74 हजार 366 लाभार्थी हे पुरुष आहेत.

vaccination
लसीकरण
author img

By

Published : May 14, 2021, 4:41 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पहिल्या लाटेत महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाची लागण मोठ्या संख्येने झाली आहे. तर दुसऱ्या लाटेतही कोरोना बाधितांमध्ये पुरुषांचा आकडा मोठा आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी पुरुष मोठ्या संख्येने पुढे येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आतापर्यंत झालेल्या 1 कोटी 96 लाख 18 हजार 850 लाभार्थ्यांपैकी 83 लाख 74 हजार 366 लाभार्थी हे पुरुष आहेत. तर महिला तशा पिछाडीवर असून आतापर्यंत 71 लाख 54 हजार 556 महिलांचे लसीकरण झाले आहे.

आतापर्यंत 20 लाख 91 हजार 370 महिला कोरोना बाधित

कोरोनाचा धोका हा ज्येष्ठांना सर्वाधिक असल्याचे म्हटले जात असताना महिलांना धोका कमी असल्याचेही म्हटले जात होते. त्यानुसार सुरुवातीपासूनच बाधित महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे. कोरोनाच्या पहिल्या दिवसपासून आजपर्यंत राज्यात (13 मे पर्यंतची आकडेवारी) 52 लाख 59 हजार 292 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानुसार यात 40 टक्के महिला तर 60 टक्के पुरूष आहेत. 20 लाख 91 हजार 370 महिलांना तर 31 लाख 44 हजार 437 पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. महिलांची रोगप्रतिकारक शक्ती हा भाग या मागे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे, पण त्याचवेळी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडत नसल्याने त्या सुरक्षित राहत असल्याचेही म्हटले जात आहे.

हेही वाचा - जुन्नर येथे आढळला बिबट्या; परिसरात भितीचे वातावरण

लवकरच लसीकरण 2 कोटींचा टप्पा करणार पार

16 जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यात सद्या एकूण 4429 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. यातील 4147 केंद्र सरकारी असून 282 केंद्र खासगी आहेत. 16 जानेवारीला पहिल्या दिवशी राज्यात 71 हजार 111 जणांचे लसीकरण झाले. महाराष्ट्र लसीकरण मोहिमेत सुरवातीपासून आघाडीवर आहे. पण राज्याला पुरेशा लसच मिळत नसल्याने लसीकरणाला ब्रेक लागताना दिसत आहे. असे असतानाही आता लवकरच अगदी दोन-तीन दिवसांत राज्य लसीकरणाचा 2 कोटीचा आकडा पार करणार आहे. कालपर्यंत राज्यात 1 कोटी 96 लाख 18 हजार 850 जणांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस घेतलेल्याचा आकडा 1 कोटी 55 लाख 30 हजार 983 इतका आहे. तर 40 लाख 87 हजार 860 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आज 86 हजार 225 जणांचे लसीकरण होत आहे. लस मुलबक प्रमाणात उपलब्ध झाल्या असत्या तर 2 कोटींचा आकडा राज्याने केव्हाच पार केला असता.

18 ते 30 वयोगटातील केवळ 8 लाख 26 हजार 819 जणांचेच लसीकरण

लसीकरण मोहिमेत हाय रिस्कमधील लोकांना अर्थात कोरोना योद्धे (डॉक्टर, नर्स,आरोग्य कर्मचारी), फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जे काही लसीकरण झाले त्यात 45 पुढील नागरिकांचा आकडा मोठा आहे. महत्वाचे म्हणजे 18 ते 44 वयोगटाला मे पर्यंत लसीकरण मोहिमेपासून दूर ठेवण्यात आले. तर त्यांना 1 मे पासून मोहिमेत सामावून घेण्यात आले. पण या गटाचे लसीकरण सुरू होऊन 11 दिवस होत नाहीत तो त्याच्या लसीकरणास स्थगिती देण्यात आली. लसीचा तुटवडा आणि दुसरा डोस निश्चित वेळेत देण्याची गरज या पार्श्वभूमीवर या गटाचे लसीकरण स्थगित करण्यात आले. एकूणच सरकारच्या या भूमिकेवर या गटाकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तर आता त्यांचे लसीकरण कधी सुरू होणार हा प्रश्नच आहे. दरम्यान आतापर्यंतचे लसीकरणाचे आकडे पाहता 18 ते 30 वयोगटातील केवळ 8 लाख 26 हजार 819 जणांना लस देण्यात आली आहे. तर 30 ते 45 मधील 17 लाख 26 हजार 930 जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळेच 45 वरील नागरिकांचेच लसीकरण सर्वाधिक आहे. 45 ते 60 वयोगटातील 69 लाख 11 हजार 268 जणांनी लस घेतली आहे. तर 60 पुढील 60 लाख 63 हजार 418 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण लसीकरणाची आकडेवारी लक्षात घेतली तर लसीकरण झालेल्या महिलांचा आकडा 71 लाख 54 हजार 556 इतका आहे. तर 81 लाख 74 हजार 366 पुरुषाचे लसीकरण झाले आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : लसीकरणासाठी नाव नोंदवत आहात..? तर व्हा सावधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.