ETV Bharat / city

खजुराच्या कंटेनरमधून सिगारेटची तस्करी; सुमारे अकरा कोटींचा माल जप्त.. - जेएनपीटी सिगारेट तस्करी

मिळालेल्या माहितीनुसार; दुबईहून जेएनपीटी, न्हावा शेवा बंदरावर आलेल्या एका जहाजामधील खजूराच्या कंटेनरमधून या सिगारेटी जप्त करण्यात आल्या आहेत. कंटेनरची सविस्तर तपासणी केल्यानंतर विदेशी ब्रँडच्या तब्बल ७१ लाख ६१ हजार ६०० सिगारेट आढळून आल्या.

Smuggled Cigarettes worth 11 crore seized from JNPT mumbai
खजुराच्या कंटेनरमधून सिगारेटची तस्करी; सुमारे अकरा कोटींचा माल जप्त..
author img

By

Published : Jun 13, 2020, 1:13 AM IST

मुंबई - जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, म्हणजेच जेएनपीटी बंदरावर सुमारे अकरा कोटींच्या विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. विशेष म्हणजे, चक्क खजुराच्या कंटेनरमध्ये लपवून या सिगारेटींची तस्करी करण्यात येत होती.

मिळालेल्या माहितीनुसार; दुबईहून जेएनपीटी, न्हावा शेवा बंदरावर आलेल्या एका जहाजामधील खजूराच्या कंटेनरमधून या सिगारेटी जप्त करण्यात आल्या आहेत. कंटेनरची सविस्तर तपासणी केल्यानंतर विदेशी ब्रँडच्या तब्बल ७१ लाख ६१ हजार ६०० सिगारेट आढळून आल्या. यांची एकूण किंमत सुमारे अकरा कोटी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. लॉकडाऊननंतर परदेशी सिगारेटची मागणी प्रचंड वाढल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून सक्रीय; काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.