ETV Bharat / city

Mahavikas Aghadi Government : आघाडीतील घटक पक्ष का बांधत आहेत नाराजीची मोट?

author img

By

Published : May 24, 2022, 5:49 PM IST

राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( alliance government ) पुढील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारला निवडणुकीदरम्यान मदत करणाऱ्या घटक पक्षांनी आता नाराजीचा बिगुल वाजवला आहे. सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष आपल्याकडे लक्ष देत नसल्याचे सांगत या पक्षांनी सरकारला इशारा दिला आहे.

small parties in alliance government are unhappy
आघाडीतील घटक पक्ष का बांधत आहेत नाराजीची मोट

मुंबई - राज्यात काँग्रेस ( Congress ) , राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि शिवसेना ( Shiv sena ) यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन ( Mahavikas Aghadi government ) केले. मात्र तत्पूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी साम्य असणाऱ्या समविचारी पक्षांनी या बड्या पक्षांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या बड्या पक्षांच्या सोबतच आघाडी सरकारमध्ये छोट्या घटक पक्षांचा समावेश आहे. यातील आठ महत्त्वाचे आणि मोठे पक्ष असून बाकी अन्य छोट्या छोट्या संघटना आहेत. मात्र, गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारमधील या घटक पक्षांनी छोट्या घटक पक्षांना कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे.

आघाडीतून बाहेर पडण्याचा घटक पक्षांचा इशारा - आघाडीमध्ये असलेल्या महत्त्वाच्या घटक पक्षांनी सरकारला आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले की, "राज्यातील प्रमुख आठ छोट्या घटक पक्षांसह अन्य संघटना आणि पक्षांना घेऊन सुमारे 40 पेक्षा अधिक छोट्या पक्षांनी युती सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोबत घेऊन राज्यात चार महायात्रा देखील काढल्या. काँग्रेस पक्षानेही सातत्याने युती सरकारच्या विरोधात सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मदत घेतली मात्र असे केल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला या छोट्या घटक पक्षांचा विसर पडल्याचा आरोप कवाडे यांनी केला. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव काँग्रेसने विसरू नये रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोबत असल्यामुळेच काँग्रेसचे आमदार निवडून आले हे त्यांनी विसरू नये आंबेडकरी विचारांच्या मतांसाठी काँग्रेस निळ्या झेंड्याचा केवळ वापर करीत असेल तर यापुढे तो वापर करू दिला जाणार नाही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची विशेष बैठक बोलावून या संदर्भात सरकारला बाहेर पडण्याचा इशारा देणार असल्याचेही कवाडे यांनी सांगितले.

राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर - माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला यापूर्वीच मोठा झटका मिळाला आहे.

सरकारला जाब विचारण्याची वेळ - जनता दल विधानसभा निवडणुकांत दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अनेक आश्वासने छोट्या पक्षांना दिली होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना डाव्या पक्षांसोबत आम्हीही सरकारला पाठिंबा दिला. मात्र या सरकारला सर्व छोट्या घटक पक्षांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे सरकार छोट्या घटक पक्षांबाबत जराही गंभीर नाही अथवा त्यांच्या प्रश्नांबाबत सरकार काहीही करायला तयार नाही याबाबत अनेकदा सरकारला संपर्क साधूनही फार काही होत नाही त्यामुळे आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी व्यक्त केली.

कोण कोणत्या घटक पक्षांचा सरकारमध्ये समावेश? - राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विविध छोट्या घटक पक्षांनी मदत केली आहे. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्जुन डांगळे गट, लोकतांत्रिक दल, लोकभारती, प्रहार, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल धर्मनिरपेक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी या महत्त्वाच्या पक्षांसह अन्य स्थानिक पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता.

हेही वाचा - Watermelon Grower Success Story : शेतकरी महिलेने टरबुज पिकात घेतले लाखोंचे उत्पन्न, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.