ETV Bharat / city

मान्सून आला तोंडावर...स्वयंचलित हवामान केंद्राला मिळेना गती

तापमान, वाऱ्याची दिशा, वेग, सापेक्ष आद्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी राज्य सरकारने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केंद्र उभारणीच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही.

automatic weather station
मंत्रालय फाईल फोटो
author img

By

Published : Apr 27, 2022, 4:38 PM IST

मुंबई - हवामानाचा अचूक वेध घेण्यासाठी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र केंद्र उभारणीच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. अवघ्या काहीच दिवसांत मान्सून सुरू होईल, त्यामुळे ही केंद्रे कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तापमान, वाऱ्याची दिशा, वेग, सापेक्ष आद्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी राज्य सरकारने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रामुळे पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, शेतकऱ्याला हवामान अंदाज आणि कृषी विषयक सल्ला, पिक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक योजना अंमलबजावणी आणि मार्गदर्शनासाठी ही केंद्र उपयुक्त ठरतील, हा या मागचा उद्देश होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सुमारे सहा हजार ग्रामपंचायतीमध्ये केंद्रे उभारणीचे काम हाती घेतले. मात्र हे काम अद्याप सुरू झाले नसल्याची स्थिती आहे.

मान्सून पूर्व सूचना आणि शेतीविषयक सल्ला देण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. परंतु, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. अवघ्या काहीच दिवसांत मान्सून सुरू होईल. त्यापूर्वी स्वयंचलित केंद्र सुरू करावीत, अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

सध्या २ हजार ११९ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली आहेत. या केंद्रातून पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. अतिवृष्टीत होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या स्तरावर ही केंद्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ६ हजार ग्रामपंचायतीना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडून अभिप्राय येईल, त्या ठिकाणी कामे सुरू केली जातील. लवकरच ही कामे पूर्णत्वास येतील, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.