मुंबई - राज्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत आज किंचित घट ( Covid Patient Decreased In Maharashtra ) झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) दिलेल्या आकडेवारीवरून दिसून आले. आज दिवसभरात 2 हजार 748 नव्या बाधितांची नोंद ( Maharashtra Corona Update ) झाली असून 41 जणांचा मृत्यू झाला ( Covid Deaths In Maharashtra ) आहे. सक्रिय रुग्ण 27 हजारच्या आसपास आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 97.77 टक्के इतके आहे. दुसरीकडे ओमायक्रॉनचेही रुग्ण घटले असून, आज 111 जणांना बाधा झाली आहे. मंगळवारी 351 बाधित सापडले होते. राज्याला हा दिलासा असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
लाट ओसरतेय
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात डोके वर काढले होते. सध्या ही लाट ओसरत असून, रुग्णसंख्येत देखील कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्ण संख्या तीन हजारांच्या खाली आली असून, सक्रिय रुग्ण देखील 27 हजार इतके आहेत. आज 2 हजार 748 जणांना संसर्ग झाला आहे. मंगळवारी 2 हजार 831 बाधित होते. आज किंचित घट झाल्याचे दिसते. तर मृतांचे प्रमाण वाढले असून, काल 35 जण दगावले होते, आज हा आकडा 41 इतका आहे. 5 हजार 806 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के आहे. मंगळवारी हे प्रमाण 99.73 टक्के होते.
७ कोटी चाचण्या
आजपर्यंत 7 कोटी 67 लाख 57 हजार 238 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.23 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 50 हजार 494 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 743 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1169 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 27 हजार 445 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे 111 रुग्ण
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमायक्रॉनचे आज 111 रुग्ण सापडले. मंगळवारी हा आकडा 351 इतका होता. त्यापैकी अहमदनगरमध्ये सर्वाधिक 21, नवी मुंबई 19, जालना आणि यवतमाळ प्रत्येकी 15, औरंगाबाद 10, नागपूर आणि मुंबई 9, ठाणे मनपा 6, मीरा भाईंदर व सातारा 3 आणि लातूरमध्ये 1 बाधिताची नोंद झाली आहे. आजपर्यंत 4 हजार 456 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 3334 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8904 जणांची जनुकीय चाचणी केली. 7911 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून, 913 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण
मुंबई महापालिका - 255
ठाणे - 23
ठाणे मनपा - 48
नवी मुंबई पालिका - 41
कल्याण डोबिवली पालिका - 30
मीरा भाईंदर - 9
वसई विरार पालिका - 15
नाशिक - 26
नाशिक पालिका - 59
अहमदनगर - 239
अहमदनगर पालिका - 41
पुणे - 176
पुणे पालिका - 376
पिंपरी चिंचवड पालिका - 139
सातारा - 71
नागपूर मनपा - 102