ETV Bharat / city

दुर्घटनाग्रस्त अहमद इमारतीमधून 6 जणांना सुखरूप काढले बाहेर

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील लोहार चाळ जवळ तळ अधिक चार मजली अहमद इमारत आहे. आज सकाळी 10.42 वाजताच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. ही इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र इमारत कोसळली त्यावेळी या इमारतीमध्ये 6 जण असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी अर्जुन टावरे यांनी दिली. इमारतीमधून सहा जणांना बाहेर काढण्यात आले त्यामध्ये एक महिला आणि पाच पुरुष आहेत.

अहमद इमारत
author img

By

Published : Sep 20, 2019, 2:48 PM IST

मुंबई - एखाद्या चित्रपटात इमारत किंवा पूल पडतो, त्यामधून लोकांना रस्सीच्या आणि शिड्या लावून बाहेर काढले जाते असाच चित्रपटात दिसणार सिन मुंबईत घडला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अहमद इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीमधून सहा जणांना अशाच फिल्मी स्टाईलने बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात आला आहे.

काही भाग कोसळलेल्या अहमद इमारतीची दृश्ये

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील लोहार चाळ जवळ तळ अधिक चार मजली अहमद इमारत आहे. ही इमारत म्हाडाची सेझ इमारत आहे. आज सकाळी 10.42 वाजताच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. ही इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र इमारत कोसळली त्यावेळी या इमारतीमध्ये 6 जण असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी अर्जुन टावरे यांनी दिली.
अहमद इमारतीमध्ये दोन कुटूंब राहत होती. तसेच एक गोडाऊन भाड्याने देण्यात आले होते. इमारत कोसळली त्यावेळी हे दोन कुटुंबीय वरच्या मजल्यावर अडकले होते. एक इमारत सोडून बाजूला असलेल्या इमारातीमधील गोडाऊनच्या दरवाजामधून अहमद इमारतीमध्ये रस्सी आणि शिड्या लावून या कुटुंबामधील लोकांना बाहेर काढण्यात आले. इमारतीमधून सहा जणांना बाहेर काढण्यात आले त्यामध्ये एक महिला आणि पाच पुरुष आहेत. त्यामधील दोन जण बाहेरील होते असे अर्जुन टावरे यांनी सांगितले.
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल, मुंबई महापालिका अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरू आहे.

Intro:मुंबई - एखाद्या चित्रपटात इमारत किंवा पूल पडतो, त्यामधून लोकांना रस्सीच्या आणि शिड्या लावून बाहेर काढले जाते असाच चित्रपटात दिसणार सिन मुंबईत घडला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अहमद इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीमधून सहा जणांना अशाच फिल्मी स्टाईलने बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात आला आहे. Body:मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील लोहार चाळ जवळ अहमद इमारत आहे. ही इमारत तळ अधिक चार मजली आहे. ही इमारत म्हाडाची सेझ इमारत आहे. आज सकाळी १०.४२ वाजताच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. ही इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र इमारत कोसळली त्यावेळी या इमारतीमध्ये ६ जण असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी अर्जुन टावरे यांनी दिली.

अहमद इमारतीमध्ये दोन कुटूंब राहत होती. तसेच एक गोडाऊन भाड्याने देण्यात आले होते. इमारत कोसळली त्यावेळी हे दोन कुटुंबीय वरच्या मजल्यावर अडकले होते. एक इमारत सोडून बाजूला असलेल्या इमारातीमधील गोडाऊनच्या दरवाजामधून अहमद इमारतीमध्ये रशी आणि शिड्या लावून या कुटुंबामधील लोकांना बाहेर काढण्यात आले. इमारातीमधून सहा जणांना बाहेर काढण्यात आले त्यामध्ये एक महिला आणि पाच पुरुष आहेत. त्यामधील दोन जण बाहेरील होते असे अर्जुन टावरे यांनी सांगितले.

दरम्यान सदर घटनास्थळी अग्निशमन दल, मुंबई पालिका अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित आहेत. इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरू आहे.

बातमीसाठी vis बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.