ETV Bharat / city

Mumbai Corona : रुग्णसंख्येत किंचीत वाढ.. बुधवारी 635 नवे रुग्ण, 582 जणांना डिस्चार्ज - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत आज 635 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 582 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 928 दिवसांवर पोहचला आहे.

mumbai corona update
mumbai corona update
author img

By

Published : Jul 14, 2021, 8:38 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यादरम्यान रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. त्यात गेल्या महिनाभरात घट झाली आहे. जुलै महिन्यात त्यात आणखी घट होऊन गेले दोन दिवस म्हणजेच सोमवारी 478, मंगळवारी 441 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन 635 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 582 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 928 दिवसांवर पोहचला आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 928 दिवसांवर -

मुंबईत आज बुधवारी 635 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 29 हजार 250 वर पोहोचला आहे. आज 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 654 वर पोहोचला आहे. आज 582 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 4 हजार 259 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 6 हजार 989 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 928 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 8 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 75 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 35 हजार 968 तर आतापर्यंत एकूण 76 लाख 28 हजार 469 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.