ETV Bharat / city

Silver Oak Attack : सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी चौकशी होऊन कडक कारवाई : मंत्री आदित्य ठाकरे - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ( Silver Oak Attack ) मंत्री आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट ( Aaditya Thackeray Meet Sharad Pawar ) घेतली. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली ( Strict Action On Silver Oak Attackers ) आहे.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Apr 8, 2022, 9:58 PM IST

मुंबई - विलीनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिने शांततेत आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) मुंबईतील घरावर धडक देत दगडफेक ( Silver Oak Attack ) केली. अचानक मोठ्या संख्येने कर्मचारी आल्याने एकच धावपळ उडाली. महाराष्ट्रात आजवर इतक्या खालच्या पातळीवर घाणेरडं राजकारण झालं नाही. मात्र या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray Meet Sharad Pawar ) यांनी ( Strict Action On Silver Oak Attackers ) दिला.

आदित्य ठाकरेंनी घेतली पवारांची भेट : एसटी कर्मचाऱ्याच्या सुरु असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला आज हिंसक वळण मिळाले. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडक देत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पवारांच्या निवासस्थानी चपला आणि बाटल्या फेकण्यात आल्या. महिला कर्मचाऱ्यांनी हातातल्या बांगड्या फोडून निषेध केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक मंत्री सिल्व्हर ओकवर दाखल झाले. युवासेना प्रमुख आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंही यावेळी तातडीने पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर पोहचले.

मास्टरमाईंडचा शोध घेणार : महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतके घाणेरडं झालं नव्हतं. आजपर्यंत असं कुणाच्याही घरावर आंदोलन झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी होईल आणि कडक कारवाई केली जाईल’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला आहे. या मागच्या मास्टरमाईंडचा शोध घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.