मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये ( Daud Ibrahim Money Laundering Case ) इकबाल कासकरला सात दिवस कस्टडीत ठेवल्यानंतर आज पुन्हा ईडी कस्टडी मागण्यात आली होती. मात्र, मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने ( Special PMLA Court Mumbai ) इकबाल कासकरला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय ( Iqbal Kaskar In Judicial Custody ) दिला. त्यानंतर इकबाल कासकरची ठाणे कारागृहमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
ते इंग्रजी पेपर कशाचे..?
इकबाल कासकरला आज न्यायालयात आणले असता इक्बाल कासकरचे वकील सुलतान खान यांनी न्यायालयासमोर अर्ज सादर केला. इकबाल कासकर याच्याकडून अनेक इंग्रजी पेपरवर स्वाक्षरी घेण्यात आल्या आहेत. हे पेपर काय आहे हे इकबाल कासकरला माहित नाही. कारण त्याला इंग्रजी वाचता येत नाही. त्यामुळे हे सर्व पेपर ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायालयासमोर करण्यात आली आहे. त्यामुळे ते इंग्रजी पेपर कशाचे आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.
कासकरने घेतले आहे मलिकांचे नाव
इकबाल कासकरला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ताब्यात घेतले होते. कासकर त्याच्या चौकशीदरम्यान कुर्ला येथील जमीन व्यवहारांमध्ये नवाब मलिक यांचे नाव घेण्यात आल्यानंतर काल ईडीने नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली ( Nawab Malik Inquiry ) होती. त्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले असता सात दिवसाच्या कस्टडीत पाठविण्यात आले आहे. आज सकाळपासून ईडीकडून नवाब मलिक यांचे जबाब नोंदविण्यात येत आहे.
२०१७ मध्ये खंडणी प्रकरणात अटक
ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम तसेच इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर इकबाल कासकरला ईडीने ताब्यात घेतले.
दाखल आहेत विविध गुन्हे
कासकर सध्या खंडणीच्या विविध गुन्ह्यात ठाणे कारागृहात कैद होता. काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले होते. बेकायदेशीर मालमत्ता, बेकायदेशीर व्यवहार आणि हवाला व्यवहारांची ईडीला माहिती मिळाली आहे. त्यानंतर हे छापे टाकण्यात होती. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालय कासकरची चौकशी करण्याच्या विचारात आहे.
मुंबईत मंगळवारी छापेमारी
नुकतेच ईडीने 10 ठिकाणी हे छापे टाकले होते. यामध्ये 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम, त्याची बहीण हसिना पारकर, कासकर आणि गँगस्टर छोटा शकील यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. छोटा शकील त्याच्या संबंधित असलेल्या सलीम फ्रूट याचीदेखील ईडीने 9 तास चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. ईडीने सलीम फ्रुट याच्याकडून काही महत्त्वाचे कागदपत्र देखील हस्तगत केले आहेत. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले असून, 2 बिल्डरांना समन्स बजावले आहे.