ETV Bharat / city

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार; सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण

राज्यात शिवसेना ( Shivsena ), राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. शिवसेनेकडे सर्वाधिक 56 आमदार होते. मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांनी बंड केल्याने 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची साथ सोडत शिंदे यांच्या गटात सामील झाले. राज्यातील मविआ आघाडी सरकार यामुळे कोसळले.

सचिन अहिर याचे स्पष्टीकरण
सचिन अहिर याचे स्पष्टीकरण
author img

By

Published : Jul 9, 2022, 11:14 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची सत्ता जाऊन, विधानसभेतील ( Assembly ) सेनेचे संख्याबळ ही कमी झाले आहे. परिषदेत मात्र सेनेचे संख्याबळ अधिक आहे. विधान परिषदेवर ( Legislative Council ) विरोधी पक्ष नेतेपदाचा शिवसेनेकडून ( Shiv Sena ) दावा करणार असल्याचे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिरे ( MLA Sachin Ahire ) यांनी सांगितले आहे. मुंबईत प्रसामाध्यमाशी ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. शिवसेनेकडे सर्वाधिक 56 आमदार होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्याने 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्या गटात सामील झाले. राज्यातील मविआ आघाडी सरकार यामुळे कोसळले. भाजपच्या मदतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत संख्याबळ कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत विधान परिषदेत सर्वाधिक 13 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यावर शिवसेनेकडून दावा सांगण्यात आला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात मागणी करू अशी माहिती सचिन अहिरे यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते पदी कोणाची वर्णी लागेल, हे सांगण्यासाठी नकार दिला. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान सोबत असलेले सहकारी वेगळ्या प्रवाहात गेल्याची खंत अहिरे यांनी व्यक्त केला आहे.

कोणी कितीही दावे केले तरी, चिन्ह कोणी घेऊ शकत नाही - धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाकडून दावा केला जातो आहे. कोणी कितीही दावे केले तरी, चिन्ह कोणी घेऊ शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेसोबत कायम राहील, असे सचिन अहिरे यांनी सांगितले आहे. शिवसेनेबाबत बंडखोरांकडून आपुलकी असल्याचे दाखवली जात आहे. एवढीच आपुलकी त्यांना असती, तर राजीनामा देऊन ते मैदानात आले असते, असा चिमटा सचिन अहिरे यांनी काढला आहे. कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करून, पक्ष नव्याने सुरुवात करत असल्याचे सचिन अहिरे यांनी यावेळी सांगितले आहे.

आनंदाबरोबरच दु:ख होते - याचवेळी त्यांनी शिवसेना नेत्यांच्या बंडखोरीमुळे आज आनंदाबरोबरच दु:ख होत असल्याचं म्हटलं. आज मी शपथ घेतली, त्याच्या आनंदाबरोबर दुःख सुद्धा आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी जी लोकं आमच्याबरोबर होती. ती आता वेगळ्या प्रवाहात गेल्याचं दुःख आहे. पण त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे सामना करत आहेत. भाजपकडून आता प्रभाग रचनेचा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे, पण अशा पद्धतीने विसंगती निर्माण करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा भाजपचा डाव तर नाहीना? असा प्रश्न सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Accident : पिकअपच्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, CM योगींकडून शोक व्यक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.