ETV Bharat / city

पवार-ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता

author img

By

Published : Nov 22, 2019, 8:47 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीनंतर शिवसेना राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे

मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता वेग आल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र वाढले आहे. गुरुवारी रात्री उशीरा पवार आणि ठाकरे यांच्या भेट झाली, यानंतर आता शिवसेना राज्यपालांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता...

हेही वाचा... 'राष्ट्रपती राजवटीच्या आडून मुंबईला केंद्रसशासित प्रदेश बनवण्याचा प्रयत्न'

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 23 आणि 24 नोव्हेंबरला नियोजित कार्यक्रम असल्याने मुंबईत असण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर श्वसेना आणि महाविकास आघाडीकजून राज्यपालांची आज भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राज्यपाल कार्यालयाकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

हेही वाचा... ...तर भाजपातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग - राजू शेट्टी

राजधानी नवी दिल्लीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने 'महाविकास आघाडी' दृष्टी पथात येत आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांची लवकरच बैठक होणार आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक देखील होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मातोश्री निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. दोन्ही काँग्रेसच्या बैठका पार पाडल्यानंतर शिवसेनेसोबत संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या महाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा... मुख्यमंत्री शिवसेनेचाच, आठवडाभरात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते - अनंत गीते

Intro:महाविकास आघाडीचा मुंबईत बैठकांचा जोर,शिवसे राज्यपालांना ही भेटण्याची शक्यता....

मुंबई 21

राजधानी नवी दिल्लीत शिवसेने सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या.आता महा विकास आघाडी दृष्टी पथात येत असताना काँग्रेसच्या विधी मंडळ सदस्यांची बैठक होणार आहे.तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही संयुक्त बैठक होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मातोश्री निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. दोन्ही काँग्रेसच्या बैठक पार तोडक्या नंतर शिवसेने सोबत संयुक्त बैठक होण्याची दाट शक्यता असून महाआघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना भेटण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यपाल कोशयारी यांचा 23 आणि 24 नोव्हेंबर ला नियोजित कार्यक्रम असल्याने राज्यपाल शुक्रवारी मुंबईत उपलब्ध असल्याने ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र राज्यपाल कार्यालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नाही. Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.