ETV Bharat / city

Shivsena vs BJP : 'बाळासाहेब ठाकरेंवरून विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा!' - shiv sena

शिवसेना बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या विचारापासून दूर जात असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून केला जात होता. त्यात आता राज ठाकरे यांची भर पडली असून, त्यांनीही याच मुद्द्यावर शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांबद्दल असलेल्या आत्मीयतेला हात घालण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ( Opposition targets Shiv Sena from Balasaheb Thackeray ) केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

Shivsena vs BJP
बाळासाहेब ठाकरेंवरून विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा
author img

By

Published : May 4, 2022, 6:35 PM IST

मुंबई - शिवसेना ( shiv sena ) बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या विचारापासून दूर जात असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून केला जात होता. त्यात आता राज ठाकरे यांची भर पडली असून, त्यांनीही याच मुद्द्यावर शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांबद्दल असलेल्या आत्मीयतेला हात घालण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ( Opposition targets Shiv Sena from Balasaheb Thackeray ) केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

मनसेकडून बाळासाहेब ठाकरे याच्या विचाराचा आधार - शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची साथ सोडत राज्यात महा विकास आघाडी सरकार स्थापन केली. मात्र तेव्हापासूनच शिवसेनेने हिंदुत्व सोडला असल्याची सातत्याने टीका भारतीय जनता पक्षाकडून केली जात होती. मात्र आता त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्णपणे विसरले असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून बाळासाहेब ठाकरे यांनी त्या-त्या वेळी कोणती भूमिका घेतली होती. आणि त्या भूमिकेपासून आता शिवसेना कशी लांब जात आहे हे सांगण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे याच्या विचाराचा आधार घेत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट - मशिदीवर लावण्यात आलेले बेकायदेशीर भोंगे त्वरित हटवले गेले पाहिजेत. यासाठी राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज्यात ठाकरे सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा मांडलेला विचार खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का करू शकत नाहीत असा सवाल आता राज ठाकरे यांच्याकडून विचारण्यात येतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणार का? शरद पवार यांचे विचार पुढे नेणार असा टोलाही राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना लावण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ जारी करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांनी व्यक्त केले आहे.

बाळासाहेबांच्या विचारावरून भाजपाचा शिवसेनेवर निशाणा - तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब किती दृढ नेते होते. हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देशभरात त्यांनी केलेलं कामाचे योगदानाची आठवण सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला करून दिली जाते. नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या आपल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या बाबत व्यक्त केलेल्या विचारापासून शिवसेना दूर गेली असल्याचा टोला आपल्या भाषणातून देवेंद्र फडणीस यांनी यावेळी लगावला होता. तसेच सातत्याने शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना राहिली नसून काँग्रेस प्रणित सेना झाली असल्याचा चिमटा सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना काढण्यात येतोय. असे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांनी व्यक्त केले आहे.

राऊतांचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने कशी झपाटलेली आहे सांगण्याचा प्रयत्न - महाविकास आघाडी सरकार स्थापन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सरकार चालवत जवळपास अडीच वर्षे पूर्ण झाले आहेत. सर्व प्रयत्न करूनही सरकारला पाडता येत नाही हे भाजपाला चांगलंच ठाऊक आले आहे. बाळासाहेब ठाकरे बाबत शिवसैनिकांमध्ये अत्यंत जिव्हाळा अद्यापही कायम आहे. त्यामुळे बाळासाहेबां बाबत भावनिक वक्तव्य करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना कसे विसरले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येतोय. जेणेकरून शिवसेनेमध्ये देखील एक कलह उभा राहता येऊ शकतो का? यासाठीच हा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. त्यातच राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही आधी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. मशिदीवरील भोंगे कायमचे निघून जावेत यासाठी बाळासाहेबांनी मुंबईसह महाराष्ट्रात आक्रमक पवित्रा घेतला होता. आता तोच पवित्रा राज ठाकरे घेत आहेत. मात्र त्याच वेळी राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याने बाळासाहेबांचे विचार शिवसेनेमध्ये उरलेत का? हे सांगण्याचा प्रयत्न राज ठाकरे आपल्या ट्विट मधून करत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेऊन शिवसेनेला भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांच्याकडून व्यक्त करण्यात येतंय. मात्र शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने कशी झपाटलेली आहे, त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जात आता सत्तेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशाप्रकारे काम करत आहेत हे सतत सांगण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत करत असल्याचेही प्रवीण पुरो म्हणतात.

हेही वाचा - Devendra Fadnavis : 'मुख्यमंत्री ठाकरे आणि माझ्या बायकोत एकच साम्य...'; फडणवीसांचे मिश्कील उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.