मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असणारे सामनातून पाकिस्तांवर तिरकस बाणांचा मारा करत पाकिस्तानने भारतासोबत संबंध तोडल्याबद्दल पायावर धोंडा मारून घेतला या बद्दल अभिनंदन केले आहे.
पाकिस्तानामध्ये असा कोणता महान उद्योग बहारला आहे कि, त्यातून दोन देशातील आयात-निर्यातीस चार चांद लागले आहेत. असे बोलत भारतासोबत संबंध तोडून तुम्ही तुमच्याच पायावर जो धोंडा मारलात या बद्दल पाकिस्तानचे त्रिवार अभिनंदन. असे उपरोधिक बोल शिवसेनेने सामनातून सुनावले आहेत.
भारतीय संसदेने जम्मू काश्मीरसाठी असलेले कलम ३७० हटवले आहे. या नंतर पाकिस्तानने अनावश्यक जळफळाट दाखवताना भारतासोबतचे असलेले सर्व व्यापारी संबंध एकतर्फी तोडले आहेत. पाकिस्तांच्या या कृतीचा खरपूस समाचार शिवसेनेने आपले मुखपत्र सामानातून घेतला आहे.
खासदार संजय राऊत यांनी संसदेमध्ये केलेल्या विधाननंतर पाकिस्तानमध्ये त्याला अनुकूल असे फलक लावण्यात आले होते. या मुद्द्याला पकडून शिवसेना आता पाकिस्तानच्या हद्दीत घुसली आहे, लवकरच भारताची सेना पण घुसेल असे खणखणीत बोल सामनातून सुनावले आहे.
सामानाच्या अग्रलेखातील काही ठळक मुद्दे ;
- इम्रान खान यांनी कलम ३७० हटवल्यामुळे पुन्हा पुलवामा हल्ला होईल असे विधान करून पुलवामा हल्ल्याची कबुली दिली आहे.
- पाकिस्तानच्या ताब्यात असलेला बेकायदेशीर काश्मीर देखील लवकर घेतला जाईल आणि अखंड भारताचे स्वप्न लवकरच साकार होईल.
- पाकिस्तानातून भारतीय दूतावासाला परत पाठवण्यात आले याबद्दल बोलताना, पाकिस्तानातील दूतावासाला टाळे लावा हि आमची पूर्वी पासून मागणी होती. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातूनच फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन मिळत होते.
- उभय देशात कोणतेही भावनिक संबंध नव्हते. पठाणकोट, पुलवामा नंतर सर्व चर्चा बंद झाल्या होत्या. कारण चर्चा आणि घातपात एकाच वेळी शक्य नाही.
- पाकिस्तानात परिस्थिती ठीक नाही तेथील लोक अजूनही साधारण आयुष्य पण जगू शकत नाही अशा परिस्थितीत त्यांनी भारतासोबत व्यापारी संबंध तोडून काय सध्या केले आहे? असा सवाल शिवसेनेने केला
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाना
डोनाल्ड ट्रम्प यांनी ३७० रद्द करण्यापूर्वी भारताने चर्चा केली नाही असे वक्तव्य केले होते यावर बोलताना अमेरिकेने इराकचा घास घेताना , सद्दामला फासावर लटकावताना कुठे भारताला विचारले होते असा सवाल केला. भारत हा सार्वभौम राष्ट्र आहे म्हणून तो जे काही करेल ते कोणाला सांगण्याची गरज नाही असे सांगितले आहे.