मुंबई - पत्राचाळ ही बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील योजना होती. त्या योजनेत शिवसैनिकांचा हस्तक्षेप असणे चुकीचा आहे. तसेच, गरिबांना घर देण्यासाठी अशा प्रकारची कारवाई झाल्यास मनमानी करणाऱ्या बिल्डरांना चाप लागेल, अशा कानपिचक्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना दिल्या ( deepak kesarkar on sanjay raut ) आहेत.
शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. त्यानंतर दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली आहे.
'शिवसैनिकाचा हस्तक्षेप असेल ती सुद्धा चुकीचा...' - पत्राचाळ ही संकल्पना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबां ठाकरेंच्या संकल्पनेतील आहेत. सर्वसामान्य लोकांना त्यांचे घर मिळावी म्हणून त्यांची घर ताब्यात घेतले जातात. त्यानंतर लोक रस्त्यावर येतात. मात्र, त्यांना त्यांच्या मालकीच्या घर दिली जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि अशा प्रकारच्या योजनेत कोणत्या शिवसैनिकाचा हस्तक्षेप असेल ती सुद्धा चुकीचे आहे. मोठमोठ्या बिल्डरांवर कारवाई झाली आहे. आजपर्यंत चार ते पाच बिल्डरांवर कारवाई झाली आहे. अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमुळे संजय राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकल्प विकले, मात्र ज्यांच्याकडून आलेला पैसा परत केला नाही. कोरोना सारख्या स्थितीमधली परिस्थिती समजू शकतो. पण, जेव्हा पैसे येतात, तेव्हा ते देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे उल्लंघन झाल्यास कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून बिल्डर आणि यामध्ये वचक बसेल आणि त्यांना वेळेत घरे मिळतील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
'पुरावे असल्याशिवाय ईडीने अटक...' - संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याशी संबंधित असलेले प्रवीण राऊत हे अटकेत आहेत. त्यामुळे चौकशी सुरू असताना ईडीला काही पुरावे मिळाले असतील, तरच ईडीने त्यांच्यावरती कारवाई केली असेल. केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करायची झाल्यास आवश्यक पुरावे लागतात. न्यायालयात ते प्रकरण सिद्ध करावे लागते. मात्र, पुरावे असल्याशिवाय ईडीने अटक केली नसेल. त्यामुळे त्यांचे वकील त्यांचा बचाव करतील, असे केसरकर यांनी म्हटलं.
'शिरसाट बोलले ही त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया' - ज्यांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्यांच्यावर जर कारवाई होत असेल तर शिवसैनिकांना आनंदच झाला असेल, अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार संजय सिरसाट यांनी व्यक्त केली. त्यावरती बोलताना केसरकर म्हणाले, अशी शिंदे गटाच्या आमदारांची यांची भावना नाही. राऊतांनी आमदारांबाबत इतक्या खालच्या आणि निर्भास्तपणे टीका केली आहे की, त्याच्या बाबत चीड येणे स्वाभाविक आहे. शिरसाट बोलले ही त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मात्र, आम्हाला त्यावर बोलायचं नाही. महाराष्ट्रासाठी काम करायचा आहे. कोणाच्या बाबत राग मनात ठेवण, हे आमचं कर्तव्य नाही. महाराष्ट्राची संस्कृती आम्ही जपली आहे.
'संजय राऊत यांच्यावर चिडभावनने कारवाई...' - केंद्रीय तपास यंत्रांकडून शिंदे गटात आलेल्या पैकी कोणाचीही चौकशी कुठेही थांबलेली नाही. संजय राऊत यांची ही चौकशी सुरू होती. त्यांना कुठे तीन महिने अटक झाली होती. आज अखेर पुरावे मिळाल्याने कारवाई झाली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत असे बोलणे योग्य नाही. चौकशी आणि अटक होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चौकशीमध्ये पुरावे मिळाले तरच कारवाई होते आणि राऊत यांच्याबाबत आज पुरावे मिळाले आहेत. तसेच संजय राऊत यांच्यावर चिडभावनने कारवाई करण्यासारखं काही नाही. ते स्पिरिटमध्ये बोलतात लोकही तसेच विसरून जातात. मात्र, राजकारणात असल्याने यातून सुटण्यासाठी अशा पध्दतीची अपेक्षा ठेवणे योग्य नाही, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Arvind Sawant : संजय राऊत ईडीच्या ताब्यात; अरविंद सावंतांची केंद्र सरकारवर कडाडून टीका, म्हणाले...