ETV Bharat / city

ईडी प्रकरण : हे तर भाजपचे प्रदेश कार्यालय...सेनेचे बॅनर्स! - shivsena protests in dadar

शिवसेना आणि भाजप हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला एका प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर आगीत आणखी तेल ओतल्याची परिस्थिती ओढावली आहे.

shivsena protest on shivsena bhavan
मुंबईतील ईडी  कार्यालयावर शिवसेनेतर्फे 'भाजप प्रदेश कार्यालय' असे बॅनर लावण्यात आले.
author img

By

Published : Dec 28, 2020, 3:57 PM IST

मुंबई - शिवसेना आणि भाजप हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला एका प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर आगीत आणखी तेल ओतल्याची परिस्थिती ओढावली आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता टीकेची झोड उठत आहे. यातूनच आज मुंबईतील ईडी कार्यालयावर शिवसेनेतर्फे 'भाजप प्रदेश कार्यालय' असे बॅनर लावण्यात आले.

ईडी प्रकरण : हे तर भाजपचे प्रदेश कार्यालय...सेनेचे बॅनर्स!
पत्नीला पाठवलेली नोटीस हे सूडबुद्धीने केलेले राजकारण आहे, असं म्हणत सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची नावं ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना अशा काहीतरी कारवाई करून सरकार पाडण्यासाठी परावृत्त करणं, हा भाजपचा डाव आहे, असे राऊत म्हणाले. पण आम्ही या राजकारणाला घाबरत नाही. जे करायचंय ते करा, असे आवाहनच राऊत यांनी दिले.या प्रकरणामुळे शिवसैनिक भाजपवर नाराज आहेत. यामुळेच दादरच्या शिवसेना भवनाखाली शिवसैनिकांनी गर्दी करत भाजपविरोधात घोषणा दिल्या आणि ईडीद्वारे नेत्यांवर होणारी कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.