ETV Bharat / city

काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, पण... शिवसेनेचा सहकारी पक्षाला सल्ला

पंजाब काँग्रेसमध्ये आधी कॅप्टन अमरिंदर सिंग नंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याने देशात सध्या काँग्रेसमधील गोंधळावर चर्चा सुरु आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्रातील सहकारी शिवसेनेनेही काँग्रेसला सल्ला दिला आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने काँग्रेसमधील हा गोंधळ पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे निर्माण झाल्याचे सांगत लवकर पक्षाला सेनापती द्या, असा सल्ला दिला आहे.

Shivsena on Punjab Congress
Rahul Gandhi
author img

By

Published : Oct 1, 2021, 8:40 AM IST

मुंबई - काँग्रेसने उठवळ, बेभरवशाच्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर अति विश्वास दाखवला आणि त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग पक्षापासून दूर गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले? असा सवाल करत काँग्रेसचा महाराष्ट्रातील सहकारी पक्ष शिवसेनेने पंजाब काँग्रेसमधील घडामोडींवरुन काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? असा सल्लावजा सवालही शिवसेनेने काँग्रेसला केला आहे.

काय म्हटले आहे सामनात...

'गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नाही. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे, भाजपच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत 'पतली' झाली व काँग्रेसच्या वाडय़ातील उरलेसुरले वतनदारही सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा याक्षणी मुळापासून हादरला आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?' असा सवाल शिवसेनेने केला आहे.

'कॅ. अमरिंदर हे तीन कृषी कायद्यासंदर्भात किती वेळा दिल्लीत आले?'

कॅप्टन अमरिंदर यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेस सोडणार असल्याच्या वक्तव्याचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. अग्रलेखात म्हटले आहे, '79 वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपात जातील, असे सांगितले जात होते, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्डय़ात टाकतील, असे दिसत आहे. कॅ. अमरिंदर म्हणतात, 'मी तीन कृषी कायद्यासंदर्भात अमित शहांची भेट घेतली.'' हे सपशेल झूट आहे. मुख्यमंत्री असताना हेच अमरिंदर पंजाबच्या शेतकऱयांना सांगत होते, आंदोलन पंजाबात करू नका, तर दिल्लीत करा. म्हणजे त्यांना शेतकऱयांची ही आक्रमकता स्वराज्यात नको होती. मुख्यमंत्री असताना कॅ. अमरिंदर हे तीन कृषी कायद्यासंदर्भात किती वेळा दिल्लीत आले? उलट त्यांची भूमिका मोदी सरकारधार्जिणी व शेतकऱयांत फूट पाडण्याची होती असे सांगतात. आता हे महाराज शेतकऱयांचे कैवारी बनले. कॅ. अमरिंदर यांना केंद्रीय कृषी मंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही, असे मोदींचे धोरण आहे. कॅ. अमरिंदर यांचे वय 79 आहे. तेव्हा कसे काय होणार?' असा सवाल भाजपला केला आहे.

'पडक्या वाड्यात जुने वतनदार पथारी पसरुन'

पंजाबच्या निमित्ताने काँग्रेसमधील गोंधळ समोर आला आहे. तसेच काँग्रेसमधील ज्येष्ठांच्या भूमिकेवर सामनातून टीका करण्यात आली आहे. 'पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवडय़ांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱया बोलघेवडय़ांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात. पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही नेतृत्वबदल होईल व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही जावे लागेल अशी हवा निर्माण झाली होती. ती पंजाबमुळे थंड पडली. जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाडय़ातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी वाडय़ाची डागडुजी करू इच्छितात. वाडय़ास रंगरंगोटी करू पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करू देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे?' असा सवाल करत शिवसेनेने अग्रलेखातून काँग्रेसला लवकर अध्यक्ष निवडण्याचा सल्लाच दिला आहे.

कन्हय्या, जिग्नेश यांच्यामुळे काँग्रेस उसळी मारु शकेल काय?

'एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय? कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवानीसारखे तरुण काँग्रेस पक्षात आले. गुजरातचा हार्दिक पटेलही आलाय. पण त्यामुळे काँग्रेस उसळी मारू शकेल काय? पंजाबात गोंधळ सुरू असताना गोव्यातील काँग्रेसचे जुनेजाणते लोक पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्यात माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो आहेत. कॅ. अमरिंदर, लुईझिन फालेरो यांना मुख्यमंत्रीपदासारखे सर्वोच्च पद पक्षाने देऊनही हे लोक काँग्रेस सोडायला धजावतात हा निगरगट्टपणाचा कळस झाला. जितीन प्रसाद यांना काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद दिले होते. हे प्रसाद भाजपात गेले व त्यांना उत्तर प्रदेशात मंत्री केले. भाजपकडे मंत्रीपदे वाटण्याची क्षमता आहे म्हणून आज लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणे असे म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे काय होणार, असा घोर लागला आहे. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी उपचारही सुरू आहेत, पण ते चुकीचे आहेत का, याचा विचार व्हायला हवा.' असा सल्ला महाराष्ट्रातील सहकारी पक्षाने काँग्रेसला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.