ETV Bharat / city

'तंगड्या तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी तंगड्या सर्वांनाच असतात हे लक्षात ठेवा' - पत्रकार परिषद

उदयनराजे भोसले यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले. तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात हे लक्षात ठेवावे, असे राऊतांनी उदयनराजेंना सुनावले.

sanjay raut lashes udayanraje bhosale
संजय राऊत यांचे उदयनराजे यांना चोख प्रत्युत्तर
author img

By

Published : Jan 16, 2020, 12:43 PM IST

Updated : Jan 16, 2020, 2:37 PM IST

मुंबई - उदयनराजे भोसले यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो पण तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही. तंगड्या तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी तंगड्या सर्वांनाच असतात हे लक्षात ठेवावे, असे राऊतांनी उदयनराजेंना सुनावले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत यांचे उदयनराजे भोसले यांना चोख प्रत्युत्तर...

उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा जोरादार समाचार घेतला होता. संजय राऊत यांनी देखील त्यांच्या सर्व वक्तव्याचा जोरदार प्रतिकार केला आणि माध्यमांसमोर परखडपणे उत्तर दिले आहे.

हेही वाचा... काश्मीर मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघाचा चीनसह पाकिस्तानला पुन्हा दणका

काय म्हणाले संजय राऊत ?

'शिवसेनेवर कोणत्याही प्रकारची टीका केली जाणार, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलले जाणार, शरद पवार यांच्याबद्दल बोलणार, तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायचं, आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलायचे. हा जर तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार असेल, तर मग उत्तर देण्याचा अधिकार सर्वांना आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोण कोणत्या घराण्यात जन्माला आलेला आहे, म्हणून त्याला महाराष्ट्रातील इतर श्रद्धा स्थानांविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा आदर राखा. हिच महाराष्ट्राची परंपरा आणि भूमिका कायम राहिलेली आहे, आम्ही त्यानुसार वागतो, असे स्पष्ट भुमिका राऊत यांनी घेतली.

तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाही चालत नाही...

तंगड्या तोडण्याची भाषा कोणत्याही लोकशाहीप्रधान राज्यात चालत नाही, मग ती कोणीही केली असली तरी देखील. तंगड्या प्रत्येकाला असतात. सामान्य माणूस देखील तुम्हाला उत्तर देऊ शकतो. जर अशा प्रकारचे विधान केले असेल तर उत्तर देण्याचा अधिकार मला व या राज्यातील देशातील सामान्य नागरिकाला आहे, मग तुम्ही कितीही मोठे असाल, असे बोलत संजय राऊत यांनी उदयनराजेंवर प्रतिहल्ला चढवला.

हेही वाचा... ठाकरे सरकारचा फडणवीसांना पुन्हा दणका, 'या' नियुक्त्या केल्या रद्द

लोकशाहीत प्रश्न विचारले जाणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लोक प्रश्न विचारतात, राष्ट्रपतींना देखील प्रश्न विचारतात, ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये जे तुम्हाला पटत नसेल त्यावर तुम्ही उत्तर द्या. परंतु, प्रश्न विचारले म्हणून तंगड्या तोडण्याची भाषा स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या व्यक्तीने करू नये. तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही राजकारणाच्या बाहेर असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. तुम्ही एका पक्षाचे नेते आहात. तुम्हाला त्या पक्षाच्या भूमिकांना घेऊन चालावे लागणार असेल, तर मग आमचा देखील पक्ष आहे,संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Intro:Body:

Sanjay Raut, Shiv Sena in Mumbai: The respect that I have always shown towards Indira Gandhi, Pandit Nehru, Rajiv Gandhi & the Gandhi family, despite being in opposition, nobody has done it. Whenever people have targeted Indira Gandhi, I have stood up for her.

Conclusion:
Last Updated : Jan 16, 2020, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.