ETV Bharat / city

Anil Desai : भाजपसोबत कोण, कसे गेले, हे पडताळून पाहिले.. पक्ष त्यावर विचार करणार - अनिल देसाई

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार ( Shivsena Candidate Sanjay Pawar ) यांचा पराभव ( Rajya Sabha Election Result ) झाला. हा पराभवानंतर शिवसेनेने भाजपसोबत गेलेल्यांची यादीच तयार केली आहे. याबाबत बोलताना शिवसेना खासदार अनिल देसाई ( MP Anil Desai ) यांनी 'भाजपसोबत कोण, कसे गेले हे पडताळून पहिले आहे. त्यावर पक्ष विचार करेल', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Anil Desai
अनिल देसाई
author img

By

Published : Jun 11, 2022, 9:16 AM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha Election Result ) संजय पवार ( Shivsena Candidate Sanjay Pawar ) यांचा झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागला आहे. एकूण आठ मते भाजपकडे गेल्याने धनंजय महाडिक विजयी झाले. नेमके मतांचा आकडा कुठे चुकला, हे आम्ही पडताळून पाहिले. कोण कशा पद्धतीने गेले, याबाबत विचार केला जाईल, असे खासदार अनिल देसाई ( MP Anil Desai ) यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या राज्यसभेची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला. या पराभवाबाबत खासदार अनिल देसाई यांनी भाष्य केले.

आम्हाला जी अपेक्षित मत होती ती न मिळाल्याने चार ते पाच मतांच्या फरकाने आमचा दुसरा उमेदवार पराभूत झाला. भाजपने घेतलेला आक्षेपावर आम्ही तशाच स्वरूपाची हरकत घेतली होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयात दुर्दैवाने आम्हाचेच मत बाद झाले. एकूण कुठे चुकलो, कुठे मत कमी पडली. कोण कशा पद्धतीने भाजपसोबत गेले याबाबतीत अभ्यास केला आहे. पक्ष त्याबाबत विचार करेल, असे निर्णय असे अनिल देसाई यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Dhananjay Mahadik : देवेंद्र फडणवीस हेच आजच्या विजयाचे खरे शिल्पकार : धनंजय महाडिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.