ETV Bharat / city

Shivsena Melava शिवसेनेच्या मेळाव्यात नेते संजय राऊतांसाठी खुर्ची आरक्षित

author img

By

Published : Sep 21, 2022, 7:09 PM IST

Updated : Sep 21, 2022, 7:15 PM IST

Shivsena Melava Leader Sanjay Raut शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी नेस्को मैदानात संवाद साधणार आहेत. मेळाव्याची जाहीर तयारी सुरू असून पदाधिकारी ही मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या या पदाधिकारी मेळाव्यामध्ये व्यासपीठावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे.

Shivsena Melava
Shivsena Melava

मुंबई शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी नेस्को मैदानात संवाद साधणार आहेत. मेळाव्याची जाहीर तयारी सुरू असून पदाधिकारी ही मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या या पदाधिकारी मेळाव्यामध्ये व्यासपीठावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली, असून ते सध्या तुरुंगात आहेत. मात्र शिवसेना राऊत यांच्या पाठीशी ठाम उभी असल्याचा संदेश यातून देण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेत फूट पाडल्यानंतर 12 खासदारांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. शिंदे गटाने यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि शिंदे गट असा वाद पेटला आहे. या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. गोरेगाव येथील नेस्कोच्या मैदानात प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

राऊत यांच्यासाठी खुर्ची राखीव शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजीप्रभू सारखी खिंड लढवली. भाजप, बंडखोर शिंदे गट आणि विरोधकांचा सातत्याने समाचार घेतला आहे. अखेर गोरेगाव येथील कथित पत्राचाळ प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली आहे. सध्या राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांना अटक झाल्याने शिवसेनेचा आवाज दाबला गेला आहे. मात्र, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातील राऊत आदराचे स्थान कायम आहे. त्यामुळेच व्यासपीठावर राऊत यांच्यासाठी खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे. एकीकडे अनंत गीते तर दुसरीकडे भास्कर जाधव यांना स्थान देण्यात आले आहे.

शिवसैनिकांचा उत्साह शिगेला गोरेगाव येथील सभेसाठी महिला आणि पुरुष शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान, ठाकरेंच्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये जोश आला आहे. शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत. महिला भगव्या साड्या परिधान करून आल्या आहेत. पुरुषांनी भगवे झेंडे, वस्त्र, टोप्या आणि शिवसेनेचा गमछा परिधान केला आहे. मैदानात भगवामय झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिस्तबद्ध पध्दतीने प्रवेश करत आहेत. प्रवेशद्वारावर प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

Last Updated : Sep 21, 2022, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.