ETV Bharat / city

आमदार नियुक्ती प्रलंबित ठेवण्यामागे राज्यपालांवर राजकीय दबाव असेल -संजय राऊत - राज्यपाल कोश्यांरीवर राजकीय दबाब

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर दबाब असल्यास त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार विरुद्ध राजभवन असा संघर्ष यापूर्वी कधी झाला नव्हता आता का होत आहे असा सवाल ही केला आहे. तसेच खंजीर प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडे दुर्लक्ष करण्याचा टोला लगवला.

राज्यपालांवर राजकीय दबाव असेल -संजय राऊत

author img

By

Published : Sep 2, 2021, 1:30 PM IST

Updated : Sep 2, 2021, 1:59 PM IST

मुंबई - राज्यपालाच्या कोट्यातून नियुक्त करण्यात येणाऱ्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रलंबित प्रकरणी मुहाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केल आहे. राजभवनावरील भेटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हसरे चेहरे सर्वांनी पाहिले, त्यामुळे तिकडचा माहोल किती सकारात्मक होता हे समजले असेलच. परंतु 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात हायकोर्टाला मध्ये येण्याची गरज नव्हती, मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर बारा आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. राज्यपाल यांनी गेले आठ महिने ते केले नाही, याचा अर्थ नक्कीच त्यांच्यावर दबाव आहे, असे मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

राज्यपालांवर राजकीय दबाव असेल -संजय राऊत

आमदार नियुक्त अद्याप प्रलंबित ठेवण्यामागे राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट करायला हवा, महाराष्ट्रात सरकार विरुद्ध राजभवन हा संघर्ष आजपर्यंत कधी झाला नाही, तो यानिमित्ताने का होत आहे, याचा विचार कोश्यारी यांनी करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली आहे.

महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामे आहेत-

राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. आता त्या जागी दुसरा येऊ लागला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली होती, यावर बोलताना राऊत यांनी महाराष्ट्रा पुढे खूप मोठी कामे आहेत, देशात पहिल्या पाच मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत आहे, हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो, शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे. शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार बाळासाहेबांचा पासून ते उद्धव ठाकरे पर्यंत कोणी केले नाहीत, बंद दाराआड काय झालं होते आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले, या चर्चेत आता आम्ही जात नाही. महाराष्ट्रातलं वातावरण आता वेगळे आहे आणि या जनतेला मदतीची गरज आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे म्हणत पाटलांची खिल्ली उडवली.

Last Updated : Sep 2, 2021, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.