ETV Bharat / city

राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावे - संजय राऊत - संजय राऊत यांनी केली चौकशीची मागणी

संजय सिंह यांनी सादर केलेले पुरावे धक्कादायक आहेत. अयोध्या हा इतरांसाठी राजकारणाचा भाग असला तरी आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. सामान्य लोकांच्या घराघरातून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात आली आहे. या निधीचा गैरवापर होणार असेल तर श्रद्धेला काही अर्थ राहणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 14, 2021, 12:49 PM IST

मुंबई - अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच लागली आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडल आहे. या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केले पाहिजे, अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली, ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणी आपल्याला आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी फोन करुन घोटाळ्याची माहिती दिली आहे. संजय सिंह यांनी सादर केलेले पुरावे धक्कादायक आहेत. अयोध्या हा इतरांसाठी राजकारणाचा भाग असला तरी आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. सामान्य लोकांच्या घराघरातून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात आली आहे. या निधीचा गैरवापर होणार असेल तर श्रद्धेला काही अर्थ राहणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्याने देशभर एकच खळबळ उडाली असून ट्रस्टच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.

दहा मिनिटात किंमत १८ कोटीवर-

उत्तर प्रदेशात पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा हा घोटाळा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जो भूखंड 2 कोटींचा आहे. तो अवघ्या दहा मिनिटात 18.5 कोटींचा करण्याची किमया ट्रस्टने साधल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी केली? हा प्रश्न विचारला जात आहे. तसेच ट्रस्टने एवढ्या महागड्या भावात भूखंड का खरेदी केला? कशासाठी केला? हा व्यवहार कधी झाला आणि त्याला मंजुरी मिळाली तरी कशी? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.