मुंबई -: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर आता संजय राऊत अधिकच आक्रमक झाले आहेत. आज सकाळीच संजय राऊत यांनी किरीट का कमाल भाग-2 अशा आशयाचे ट्विट केले यासंदर्भात आता संजय राऊत (Sanjay Raut Tweet) nd यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मुंबईत आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले राऊत ?
"महात्मा किरीट सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानमध्ये संशयास्पदरीत्या देणग्या येत आहेत. ज्यावर ईडी आणि सीबीआय छापे टाकत आहेत, त्याच कंपन्यांमधून तरुणांच्या आस्थापनांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. या कंपन्यांकडून आतापर्यंत लाखो कोटी रुपयांच्या देणग्या युवा आस्थापनांना देण्यात आल्या आहेत." असा आरोप राऊत यांनी केला आहे.
हे लोक भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करतील का ?
पुढं बोलताना राऊत म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरीमध्ये अनागोंदी आहे. त्यावरही ईडीने छापा टाकला होता. या कंपनीतून किरीट सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानच्या खात्यात लाखो रुपये ट्रान्सफर करण्यात आले. असून अशा 172 कंपन्या आहेत. भ्रष्टाचारविरोधी मुखवटा घालून हे किरीट सोमय्या अशाच प्रकारे पैसे उकळत आहेत. हे लोक भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करतील का ? अशा लोकांना पाठीशी घालून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा डागाळली आहे."
'जास्त फडफडू नका' राऊतांचा इशारा
"फक्त सोमय्याच नाही विधान परिषदेच्या भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत. या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या आहेत. जी लोकं स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड मारू नयेत. जास्त फडफडू नका सगळे पीस गळून पडतील." असा थेट इशाराच संजय राऊत यांनी सोमय्या यांना दिला होता.
म्हणून तक्रार दाखल
"महाविकास आघाडीचे अर्ध्याहून अधिक मंत्री आणि नेते भ्रष्टाचारात बुडाले आहेत. एवढ्यावरच न थांबता मी यांच्या नेत्यांची आणि मंत्र्यांचे आणखी घोटाळे बाहेर काढणार आहे. आणि म्हणून माझ्यावर दबाव आणण्यासाठी कुठला तरी टॉयलेट घोटाळा समोर आणून माझ्या पत्नीवर खोटे आरोप केले जात आहेत. माझ्या कुटुंबीयांच मानसिक खच्चीकरण सुरू आहे. आणि म्हणूनच मी माझ्या कुटुंबीयांसोबत संजय राऊतां विरोधात मानहानीची तक्रार दिली आहे." अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यामुळे, आता या राऊत विरुद्ध सोमय्या वादाचा पुढचा टप्पा काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा - MNS Bala Nandgaonkar : 'भाजपाचा युपीतील एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही'