मुंबई - शिवसेना हिंदुत्व विसरले, हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणारच, असे राणा दाम्पत्याने ( Navneet rana Mumbai House ) आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा मातोश्रीच्या ( Navneet rana Matoshree visit Mumbai ) परिसरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली. आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला वेढा घातला. सध्या राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांसोबतच मुंबई पोलिसांचा देखील पहारा आहे. त्यामुळे, मुंबई पोलिसांचे कवच व शिवसैनिकांची नजर चोरून खरंच राणा दाम्पत्य मातोश्रीवर ( Navneet Rana will recite Hanuman Chalisa at Matoshri ) येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तणावाचे वातावरण असताना भाजप नेते मोहित कंबोज काल रात्री मातोश्रीच्या परिसरात आले. यावेळी त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. याला मोहित कंबोज यांनी नंतर स्पष्टीकरण देत गाडी बदलण्यासाठी गाडीतून उतरलो होतो, असे म्हटले. तर, इथून जायला दोन रस्ते आहेत तिथे जर तुम्हाला तणावाचे वातावरण आहे हे माहिती होते तर मग तुम्ही या रस्त्यावरून का गेला ? गेलात तर गेलात गाडीतून उतरला का ? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राणा ( Navneet Rana news Mumbai ) दाम्पत्याकडून नऊ वाजता मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले होते. आता खरच राणा दाम्पत्य मातोश्रीवर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - Shivsainik Attack Mohit Kamboj Car : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला